सण उत्सवासह मिरवणुकीत सार्वजनिक स्थळी फटाके वाजवण्यास बंदी; अन्यथा…

मुंबई : धार्मिक सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने गणेश मंडळांना मोठा झटका दिला आहे. ढोल-ताशा पथकांमध्ये हातोड्याने बडवल्या जाणाऱ्या धातूच्या सिलेंडरवर (टोल वाद्य), सार्वजनिक ठिकाणी वाजवल्या जाणाऱ्या फटाक्यांवर आणि धोकादायक लेझर लाईट्सवर उच्च न्यायालयाने पूर्णपणे बंदी घातली आहे. नियम मोडणाऱ्यांची ध्वनी उपकरणे जप्त करण्याचे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

उच्च न्यायालयाने काल सुमोटो दाखल करुन घेत सरकारला आज बाजू मांडण्यास सांगितले होते. न्यायमूर्ती जीएस कुलकर्णी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने ध्वनीप्रदूषण प्रकरणावर दोनवेळा सुनावणी घेतली. मुंबई उच्च न्यायालयानं धार्मिक सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान सार्वजनिक स्थळी फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

मुंबई हायकोर्टात राज्य सरकारने बाजू मांडताना परवानगी फक्त मिरवणुकीला देण्यात आली असून ध्वनिक्षेपकांना कोणतीही परवानगी नाही असे म्हटले आहे. ध्वनिक्षेपकांचा वापर करताना मर्यादेच्या अधीन राहणे बंधनकारक असल्याचं राज्य सरकारनं कोर्टात बाजू मांडताना म्हटले. तसेच लेसर लाईटच्या वापरला तसेच मिरवणुकीत फटाके फोडायला कोणतीही परवानगी नाही, असे राज्य सरकारकडून उच्च न्यायालयामध्ये स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारच्या शांतता क्षेत्रांच्या यादीत रुग्णालय आणि शाळांसह धार्मिक स्थळ देखील शांतता क्षेत्रात मोडतात. मग गणपती मंडप देखील शांततात क्षेत्रात मोडू शकतात मात्र त्यासाठी ते सूचीबद्ध करावं लागेल अशी भूमिका राज्य सरकारने कोर्टात मांडली. धार्मिक सण-उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान सार्वजनिक स्थळी फटाके वाजवण्यास बंदी उच्च न्यायालयानं घातली आहे. तसेच ध्वनी प्रदूषणाची मर्यादा उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे तसेच उपकरणांची जप्ती करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत.

ढोल ताशा पथकांमध्ये हातोड्याने बडवण्यात येणाऱ्या सिलेंडरवर देखील बंदी घालण्यात आली आहे. मंडळांना त्यांना दिलेली परवानगी जाहीर प्रदर्शित करावी लागेल. परवानगी प्रदर्शित न केल्यास ध्वनिक्षेपक लावता येणार नाही उच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच भविष्यात परवानगी देताना अनामत रक्कम घेण्याच्या सूचना उल्लंघन समोर आल्यास अनामत रक्कम जप्त करण्याच्या सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत.

ध्वनी प्रदूषण तसेच पर्यावरणासंदर्भात नियमावली स्पष्ट आहे. तरी ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी येतात, मग हे थांबवणार कसं? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला आहे. मुंबईत 91 पोलीस ठाणी असून प्रत्येक पोलीस ठाण्याची भरारी पथक कारवाई करतात अशी माहिती राज्य सरकारनं न्यायालयात दिली.तसेच कायद्यानुसार उपकरण जप्त करण्याची देखील तरतूद आल्याची माहिती राज्य सरकारनं कोर्टात दिली.

सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाकडून पंढरपूरच्या वारीचा उल्लेख करण्यात आला. वारी हजारो लोक करतात त्यात टाळ वाजवला जातो आणि तिथे ध्वनी प्रदूषण होत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे.

पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण! म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…

पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…

संतोष पंडित जेलमधून सुटल्यावर म्हणाले; मनापासून माफी मागतो…

गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; पाहा नवी नियमावली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!