कल्याणहून अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या कुटुंबातील चौघांचा अपघाती मृत्यू…

पुणे : अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या एका कुटुंबातील चिमुकल्यासह चौघांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील मौजे तेलंगवाडी हद्दीतील डोंगरे वस्ती परिसरात अपघाताची घटना घडली. कल्याण येथील भारंबे कुटुंबावर मोहोळ तालुक्यात काळाने घाला घातला. आनंदात प्रवासाला निघालेल्या या कुटुंबावर काळानं इतका भीषण घाला घातल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

कल्याण येथील भारंबे कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी निघाले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मौजे तेलंगवाडी हद्दीतील डोंगरे वस्ती परिसरात शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास कंटेनरने त्यांच्या कारला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

अपघातात विलास भारंबे (वय ६६), शोभा विलास भारंबे (वय ६३), पार्थ तुषार भारंबे (वय आठ) आणि पूनम तुषार भारंबे (वय ३८) यांचा मृत्यू झाला आहे. यापैकी तिघांचा अपघातस्थळी जागीच मृत्यू झाला. पूनम भारंबे यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. तुषार विलास भारंबे (वय ४०) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दरम्यान, मृतांचे पार्थिव मोहोळ ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातानंतर विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली. वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी आणि सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अक्कलकोटला निघालेल्या पाच भाविकांचा अपघाती मृत्यू; पाहा नावे…

अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या युवतीची प्रियकराने केली हत्या…

अक्कलकोटवरुन परतताना कार दरीत कोसळली; चौघांचा जागीच मृत्यू…

नातेवाईकांचा आक्रोश होता हृदय पिळवटून टाकणारा; चिमुकल्यासह आईचा मृत्यू…

पंढरपूरजवळ भीषण अपघातात 4 भाविकांचा मृत्यू; जखमींचा आक्रोश…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!