
सियाच्या घरातून जुना मोबाईल पोलिसांना मिळाला; धक्कादायक माहिती समोर…
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनला संपवण्यासाठी केलेल्या नियोजनादरम्यान मोबाईलवर ‘कोडवर्ड’ (सांकेतिक भाषा) आणि ‘निकनेम’ (टोपणनावे) वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा डिलीट झालेला मोबाईल डेटा रिकव्हर करण्यात यश मिळवले असून, आता हे चॅट्स डिकोड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलिस कोठडी संपत असल्याने काल त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी आतापर्यंतच्या तपासातील प्रगतीचा अहवाल न्यायालयासमोर मांडला. पोलिसांनी सांगितले की, “आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मोबाईलमधील जे चॅट्स डिलीट केले होते, ते सायबर टीमच्या मदतीने पुन्हा मिळवण्यात आले आहेत. या संभाषणात अनेक ठिकाणी कोडवर्ड्स आणि टोपणनावांचा वापर करण्यात आला आहे. हे संभाषण नेमके कशाबद्दल होते आणि त्यांचा उद्देश काय होता, हे जाणून घेण्यासाठी दोन्ही आरोपींना समोरासमोर बसवून चौकशी करणे आवश्यक आहे.” या कारणासाठी पोलिसांनी कस्टडी वाढवून देण्याची मागणी केली. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.
View this post on Instagram
पोलिसांनी तपासादरम्यान सिया गोयलच्या घरातून तिचा एक वर्ष जुना मोबाईल फोन जप्त केला आहे. आता पोलिस या जुन्या फोनचाही तांत्रिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांची भेट एका दिवाळी पार्टीदरम्यान झाली होती आणि हा संपूर्ण घटनाक्रम एका वर्षापेक्षा कमी कालावधीतील आहे. त्यामुळे हा जुना फोन या प्रकरणाच्या मूळ कटाचा छडा लावण्यासाठी किती महत्त्वाचा ठरेल, या दृष्टीने पोलिस सध्या तपास करत आहेत. दोघांचे चॅट्स पुन्हा मिळवणे हा पोलिसांसाठी मोठा टप्पा मानला जात आहे. मात्र, या चॅट्समध्ये वापरलेले सांकेतिक शब्द आणि टोपणनावे तपासात अडथळा ठरत आहेत. हे कोडवर्ड्स हत्येच्या कटाशी कसे जोडलेले आहेत, हे समजून घेण्यासाठी पोलिस सध्या फॉरेन्सिक आणि सायबर तज्ज्ञांची मदत घेऊन ते डिकोड करण्याचे काम अत्यंत वेगाने करत आहेत.
पोलिस कोठडीदरम्यान…
१) कट कुठे रचला, याची संबंधित ठिकाणी आरोपींना नेत तपासणी करण्यात आली.
२) हत्येचा सराव पुण्यातील लुल्लानगर येथील टेकडीवर झाला. तेथे सियाला घेऊन पोलिसांनी सरावस्थळाची पाहणी केली.
३) डिलीट डेटा रिकव्हर करण्यात पोलिसांना यश आले.
४) गुन्ह्यानंतर कुणाशी चर्चा केली, याबाबत चौकशी करून चेतनच्या एका मित्राला ताब्यात घेण्यात आले.
५) सिया आणि चेतन यांना वेगवेगळे लोहगडावर नेत घटनेचे सीन रिक्रिएशन करण्यात आले. यावेळी चेतनचे गेट अॅनालिसिस करून सबळ पुरावा मिळवला.
६) लोहगडावरील सीसीटीव्हींची तपासणी करून एकमेकांना कसे खुणावले, याची चौकशी करण्यात आली.
७) १८ जूनपूर्वीही ३१ मे, ४ जून आणि १४ जूनला केतनच्या हत्येचा प्रयत्न झाला होता का, याची घटनास्थळी जाऊन चौकशी करण्यात आली.
८) पुणे-मुंबई महामार्गावरील फूड मॉलमध्ये जाऊन केतनचा पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न केला.
९) नवे काही साक्षीदार समोर आल्याचा पोलिसांचा दावा असून, त्यांची आणि आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यात आली.
१०) हत्येपूर्वी सिया आणि चेतन यांनी किती वेळा लोहगडाची रेकी केली? या कटासाठी ते एकमेकांना किती वेळा भेटले? याची चौकशी करण्यात आली.
११) हत्येच्या कटात आणखी कोण सहभागी आहे का? याची दोघांकडे चौकशी करण्यात आली.
१२) हत्येच्या दिवशी सियाने घातलेले कपडे, बूट, बॅग तसेच चेतनची हुडी, पॅन्ट जप्त करण्यात आली.
पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…
सीन रिक्रिएशन! लोहगडावर दाट धुकं अन् पाऊस, पोलिस भल्या पहाटे चेतनला घेऊन गेले…
सियाचा चक्रावून टाकणारा खुलासा! केतनसोबत महाबळेश्वरला रुममध्ये राहायचं नव्हतं…
सिया हिचा धक्कादायक खुलासा; केतनला दरीत ढकलल्यानंतर चेतन पळून गेला अन्…
केतनच्या वडिलांनी सियाबद्दल केला मोठा खुलासा; तिला अनेक वाईट व्यसनं…
केतनचे टक्कल अन् एक गोष्ट खटकायची, पोलिस तपासात सिया लागली घडाघडा बोलू…
खळबळजनक खुलासा! सिया बारावी नापास, दारूचं व्यसन, अनेक बॉयफ्रेंड अन्…
पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल रात्रीच्या अंधारात पोहचले लोहगडावर अन्…
सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…
सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…
केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…
केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…
केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
पुणे! केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक माहिती; सिया-चेतनचं कसं जुळलं सूत पाहा…
केतनला ढकलून दिल्यानंतर सियाने लिहिली भलीमोठी पोस्ट; म्हणाली तू मला…
पुणे! लग्नासाठी 2 विमानं बूक अन् केतन अग्रवालची खूनी निघाली होणारी बायको…
पुणे! लग्नासाठी 17 कोटींचा पॅलेस बुक, दोन विशेष विमाने; लग्नाआधीच युवकाचा मृत्यू…

