
नाशिक! बहिणीसोबत प्रेमसंबंध असलेल्या युवकाला स्मशानभूमीजवळ बोलावले अन्…
नाशिक : बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून एका युवकाची धारदार चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सापगाव (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घडली आहे. ‘ऑनर किलिंग’मधून ही घटना घडली असून, त्र्यंबकेश्वर पोलिसांनी युवतीच्या भावाला अटक केली आहे. सापगाव ते ब्रह्मगिरी फेरी मार्ग रस्त्यावरील स्मशानभूमीजवळ ही रक्तरंजित घटना घडली.
आर्यन सोमनाथ कांबळे (वय १८) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. आदित्य एकनाथ मोंढे (वय २०, रा. शिरसगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आर्यन कांबळे आणि आरोपीची बहीण यांच्यात गेल्या ६ महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी आदित्य मोंढे याने आर्यनला आपल्या बहिणीसोबत असलेल्या संबंधांवरून चर्चा करण्यासाठी सापगाव येथील स्मशानभूमीजवळ बोलावून घेतले.
View this post on Instagram
दोघांमध्ये वाद झाल्यानंतरआदित्य याने जवळ असलेला धारदार चाकू काढून आर्यनच्या पोटावर, गळ्यावर, हातावर आणि छातीवर सपासप वार केले. या हल्ल्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आर्यनला उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
विशेष म्हणजे मृत आर्यन आणि आरोपीची बहीण हे दोघेही एकाच समाजाचे होते, तरीही मुलीच्या कुटुंबाला हे नातं अमान्य होते. प्रेमसंबंधामुळे कुटुंबाच्या सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याच्या चुकीच्या समजुतीतून आणि रागातून मुलीच्या भावाचे आर्यनसोबत यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते. अखेर याच रागातून आदित्यने आर्यनची निर्घृण हत्या केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आणि आरोपी आदित्य मोंढे याला तातडीने ताब्यात घेतले. पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलिस करत आहेत.
सांगली! प्रेमविवाह केलेल्या युवतीची आत्महत्या; मानपान अन् माहेरहून पैसे आण…
पोलिस भरतीवेळी प्रेम, नोकरी अन् युवतीने घेतला जगाचा निरोप…
नवविवाहितेचे लग्नानंतर दोघांसोबत प्रेमसंबंध; दोघांना एकत्र बोलावले अन्…
पत्नीचे जीम ट्रेनरसोबत प्रेमसंबंध; पहाटे प्रियकराला घरी बोलवलं अन्..
प्रेमविवाहानंतर पत्नी गेली सोडून! ‘तू भीड, आम्ही सोडवून घेऊ’ म्हणत रचला कट अन्…

