मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दहशतवादी कारवाईची धमकी…
मुंबई : मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दहशतवादी कारवाईची धमकी देण्यात आली आहे. एक-दोन दिवसांत अतिरेकी कारवाई करण्यात येईल, अशी धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. धमकी मिळाल्यामुळे मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत. धमकीचा फोन कोठून आला आणि कोणी केला याचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान, मुंबईच्या लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट होणार असल्याचा फोन दोनच दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. लोकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आले आहेत, असा दावा या व्यक्तीने केला होता. नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन येताच पोलिसांनी संबंधित व्यक्तीचे लोकेशन तपासले होते. हा फोन जुहूमधून आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर काही तासातच पोलिसांनी धमकी देणाऱ्या आरोपीला बेड्या ठेकल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी असाच एक फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. ज्यामध्ये अज्ञात व्यक्तीने मुंबईवरून गोव्याच्या दिशेने आरडीएक्सची वाहतूक करण्यात येत असल्याची माहित मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दिली होती. आता पुन्हा एकदा मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दहशतवादी करावाईची धमकी देण्यात आली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत दहशतवादी कारवाई करण्यात येईल, असे धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटले आहे. त्यामुळे पोलिस सतर्क झाले आहेत.
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन…
कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून खंडणी मागणाऱ्यास Unit-2ने केले जेरबंद…
पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…