
पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…
पुणेः विद्येच्या माहेरघरात एका शाळेत मुलींच्या चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाषाण भागातील नामांकित शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला असून, शाळेतील शिपायानेच हे व्हिडीओ रेकॉर्डिंग केल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी शाळेतील शिपाई तुषार सरोदे याला पोलिसांनी अटक असून, त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेतील किचनरूम मध्ये कपडे बदलायला करायला आलेल्या विद्यार्थीनींचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार 6 जानेवारी रोजी एका नामांकित शाळेत घडला आहे. याप्रकरणी चतुशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थीनी शाळेत असणाऱ्या किचन रूममध्ये कपडे बदलायला गेल्या होत्या. तिथे शाळेतील शिपाई सरोदे हा उपस्थितीत होता. विद्यार्थीनींनी त्याला तिथून जायला सांगितले असता त्याने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेऊन रूम मध्ये असलेल्या एका स्विच बोर्ड वर ठेवला. दरम्यान, हा सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि तात्काळ त्यांनी व्हिडीओ मोबाईल मधून डिलीट केला.
दरम्यान, घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थीनींनी त्यांच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी शाळेतील मुख्यधापिका यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असता त्याने सुरवातीला नकार दिला. मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे याच्याकडे चौकशी केली असता त्याने कबुली दिली. यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सरोदे याला अटक केली आहे. आरोपींच्या विरोधात पोक्सो सह बी.एन.एस कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात IT कंपनीतील युवतीवर कोयत्याने वार करून सहकाऱ्याने केला खून…
पुणे विमानतळावरून भाजपचा पदाधिकारी अटकेत; कारण बॅगेत…
विद्येच्या माहेरघरात युवतीला हॉटेलमध्ये नेऊन केला अत्याचार…
शिक्षणाच्या माहेरघरात लाच घेताना डीनला पकडले रंगेहात अन्…
हिंजवडीमध्ये आयटी अभियंता प्रेयसीची हत्या केली अन् शांतपणे…

