शिरूरमध्ये धावत्या ट्रकचा थरार, वाहनांना उडवत घरावर आदळला…

शिरूरः शिरूरहून राजगुरुनगरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने एक कार आणि दोन दुचाकींना धडक दिली. अपघात घडताच घाबरलेल्या ट्रकचालकाने धावत्या ट्रकमधून उडी मारली आणि पळून गेला. चालकविरहित ट्रक ताबा नसल्यामुळे सरळ एका स्थानिक नागरिकाच्या घरावर जाऊन आदळला. अवघ्या काही क्षणांत घडलेल्य या विचित्र घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पोलिसांनी अधिक माहिती देताना सांगितले, की ही ट्रक राजगुरुनगरच्या दिशेने जात असताना रामलिंग ते अन्नापुरम या दरम्यान वाहनांना धडक देत पुढे धावत होता. घाबरलेल्या चालकाने चालत्या ट्रकमधून उडी मारल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि तो सरळ एका घरावर जाऊन आदळला. या अपघातात घराचे मोठे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!