अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार झाल्याचा आईचा आरोप…

मुंबईः भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिचा 26 मार्च 2023 रोजी संशायास्पद मृत्यू झाला होता. यानंतर पंजाबी गायक समर सिंह याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आकांक्षाने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत बलात्कार झाल्याचा संशय आकांक्षाच्या आईने याचिकेत केला आहे.

अभिनेत्री आकांक्षा दुबेचा संशायास्पद मृत्यू झाला आहे. सीबीआय तपासाची मागणी करणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. अभिनेत्रीने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय याचिकेत व्यक्त करण्यात आला आहे. आकांक्षाची आई मधू दुबे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

आकांक्षा दुबे ही शूटिंगसाठी वाराणसीला गेली होती. त्यावेळी वाराणसीतील एका हॉटेलमध्ये तिने गळफास घेतला आहे. त्यानंतर समर सिंहने आकांक्षाला ब्लॅकमेल करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आईने केला. त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास घेत होते.

आकांक्षा दुबेच्या आईने दाखल केलेल्या याचिकेनुसार, ‘आकांक्षाचा मृत्यू संशयास्पद आहे. तिचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही हे निर्देश करतो. काही महत्त्वाचे पुरावे दडपण्याचा आणि आरोपींना संरक्षण देण्याचाही प्रयत्न केला जात आहे. आकांक्षा आणि समर सिंह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. आकांक्षा-समर यांची भेट 3 वर्षांपूर्वी झाली होती.

दरम्यान, टिकटॉक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तिचे व्हिडीओ पोस्ट केल्या केल्या काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवरदेखील तिचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. आकांक्षाने वयाच्या 17 व्या वर्षी तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. वीरों के वीर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की 2’ सारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह…

अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!