
PSI गोपाळ बदने पोलिस खात्यातून बडतर्फ…
सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेला पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला पोलिस खात्यातून बडतर्फ करण्यात आले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी बडतर्फ करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य केल्याचे आदेशात म्हटले आहे.
फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा अत्याचार केल्याचा आरोप डॉक्टर युवतीने केला आहे. आत्महत्येपूर्वी बदने याचे नाव तिने तळहातावर लिहिले. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक छळ केल्याचा आरोपही तिने केला होता. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असणारे कायद्याचे रक्षकच जर भक्षक झाले तर सामान्य लोकांनी कुणाकडे जायचे, असा प्रश्न उपस्थित झाल्याने बदने याला थेट पोलिस खात्यातून बडतर्फ करण्याचे निर्देश फुलारी यांनी दिले.
फलटण युवती डॉक्टर अत्याचार प्रकरणातील अटक आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने, पोलिस उपनिरीक्षक (निलंबीत) याने पोलिस दलाचे पूर्ण ज्ञान असताना, बेफिकिरीने, नैतिक अधःपतन व दुवर्तन, विकृतपणे पोलिस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरूपयोग, यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तणूक केली. पोलिस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य करुन कर्तव्य पालनात आणि दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले आहे. तसेच नमूद प्रकारे केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे.
त्यामुळे गोपाळ बाळासाहेब बदने यास शासकीय सेवेत यापुढे कर्तव्यार्थ ठेवणे सार्वजनिक आणि लोकहिताचे दृष्टीकोनातून उचित होणार नाही. म्हणून निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने (फलटण ग्रामीण पोलिस ठाणे, सातारा) यास सुनील फुलारी, विशेष पोलिस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांनी भारतीय राज्यघटना १९५० मधील अनुच्छेद ३११ (२) (ब) अन्वये दिनांक ०४/११/२०२५ रोजीपासून शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे.
फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…
फलटण प्रकरणात सस्पेन्स वाढला, WhatsApp चॅटींगमध्ये वेगळाच ट्रँगल…
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय…
फलटणमधील मृत डॉक्टर प्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर…
सातारा! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण…
फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदणे अटकेनंतर म्हणाला…
फलटणमधील डॉक्टर युवती हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर…
सातारा! महिला डॉक्टरनं हातावर सुसाइड नोट लिहून संपवलं आयुष्य…

