मुंबई पोलिसांच्या नावे बनावट फेसबुक प्रोफाईल अन् पैसे…
मुंबईः मुंबई पोलिसांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करून पैसे मागितल्या प्रकरणी चौघांविरुद्ध वरळी पोलिसांकडून प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिस दलाचे उपायुक्त डॉ. राजू भुजबळ यांच्या नावाने बनावट फेसबुक प्रोफाईल तयार करून पैसे मागितल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी केला गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत चौघांनी मिळून एकूण दोन लाख 55 हजार रुपये लोकांकडून उकळल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणात पोलिसांनी दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुंबई वाहतूक पोलिस दलात कार्यरत सलेले भुजबळ यांच्या नावाने दोन बनवट प्रोफाईल तयार करण्यात आले होते. या प्रोफाईलद्वारे काही परिचीत व्यक्तींना फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवण्यात आली होती. मग भुजबळ यांच्या नावाने आरोपींनी अनेकांकडून पैशांची मागणी केली. त्यांनी काही जणांकडून पैसेही उकळले. वरळी पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरळी पोलिस करत आहेत
दरम्यान, राज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट प्रोफाइल तयार करून पैशाची मागणी केली जात असल्याची अनेक उदाहरणे पुढे येत आहेत.
मोबाईलवर बनावट स्क्रीनशॉट दाखवून बंटी-बबली करायचे फसवणूक…
लष्करी अधिकारी म्हणून वावरणारा पुणे रेल्वे स्थानकावर जेरबंद…
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा फोन…
मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…
Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…