Video: क्रूरतेचा कळस! ‘हमासकडून युवतींचे अपहरण करून बलात्कार…

जेरुसलेम (इस्त्राईल): गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने क्रूरतेचा कळस गाठला आहे. युवतींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. इस्रायलवर शनिवारी पहाटे 5000 रॉकेटने हल्ला केला असून, अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

सोशल मीडियावर हमासच्या क्रूर आणि अमानुष कृत्यांचे धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो समोर येत आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून त्यांनी या युद्धात युवती आणि महिलांना लक्ष केले आहे. हमासकडून या युद्धात बलात्काराला शस्त्र म्हणून उपयोग करण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यामध्ये असंख्य महिला आणि युवतींचे अपहरण झाल्याचे समोर आलं आहे. इस्त्रायल वॉर रुमने याबद्दल भीती व्यक्त केली आहे. इस्रायल वॉर रुम या स्वयंसेवी संस्थेनं आपल्या अधिकृत अकाऊंटवर हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्या युवतींचे फोटो पोस्ट केले आहेत. हमासकडून शस्त्र म्हणून युवतींवर बलात्कार करण्यात येत आहे, अशी भीती इस्त्रायल वॉर रुम व्यक्त केली आहे. यात ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, ‘या रानटी लोकांवर कुठलीही दयामाया दाखवली जाऊ नये.’

युद्धाच्या नावाखाली हमास दहशवादी संघटनेकडून सुरु असलेला क्रूरेचा तमाशा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका परदेशी युवतीला ओलीस ठेवून तिला विवस्त्र करण्यात आले. त्यानंतर तिला अर्धनग्न अवस्थेत धिंड काढण्यात आली. संतापजनक म्हणजे काही दहशतवादी त्या युवतीवर थुंकताना दिसत होते. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये एक युवती स्वत:ला वाचविण्यासाठी धडपडताना दिसत आहे. तिला दहशतवादी दुचाकीवर बसून अपहरण करताना दिसत आहेत. तिच्या कुटुंबियांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

नोआ अर्गमानी असे या अपहरण झालेल्या युवतीचे नाव आहे. तर तिच्या मित्राचे नाव अवी नाथन आहे. मला मारु नका मला मारु नका अशी विनवणी करताना ती दिसत होती. तर त्याच्या मित्राला दहशतवाद्यांनी बेदम मारहाण केली आहे. संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

Video: सर्कसमधील अपघात पाहून पोटात येईल गोळा…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!