एक किलो सोनं खोदकामात सापडल्याचे सांगितले अन् पुढे…

वर्धा : बनावट दागिने दाखवून फसवणूक करणाऱ्या एकाला वर्धा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली असून, त्याच्याकडून दहा लाख रुपयेही जप्त केले. पोलिस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नईमुद्दीन काजी यांच्याकडे दोन व्यक्ती आल्या होत्या. त्यांनी काजी यांना सोन्याचा एक तुकडा दाखवला. सुमारे एक किलोचा हा तुकडा खोदकामात सापडल्याचे त्यांनी काजी यांना सांगितले. सविस्तर चर्चा झाल्यानंतर काजी यांनी ते सोनं विकत घेण्यास समहती दर्शवली. ३ ऑक्टोबर रोजी काजी व त्यांचा मुलगा सोनं खरेदीसाठी आले होते. तेथे आरोपी व त्याचे साथीदार त्यांना भेटले. त्यांनी सोन्याचा तुकडा काजी यांच्या हवाली केला. त्याबदल्यात त्यांच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर काजी व त्यांचा मुलगा मोटारीने घरी परत निघाले. मात्र तपासणी करत असताना ते सोनं खरं नसून बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना धक्का बसला.

नईमुद्दीन काजी यांना आपली फसवणूक करून १० लाख रुपये लुटल्याचेही त्यांना समजले. त्यांनी तातडीने समुद्रपूर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. तेथील संबंधित पोलिस अधिकाऱ्यांसमोर सर्व घटनाक्रम सांगितला आणि फसवणुकीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपास करत २४ तासांच्या आतमध्ये आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तसेच त्याच्याकडून १० लाख रुपयेही जप्त करत ते फिर्यादीला परत केले. या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

वर्धा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून युवतीची घराबाहेरच हत्या; गावकऱ्यांनी…

वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या पाठीवर कौतुकाची थाप…

वर्धा जिल्हा पोलिस दलाच्या इतिहासात प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन…

वर्धा सायबर पोलिस स्टेशन मार्फत फसवणुकीचा गुन्हा उघड…

वर्धा पोलिसांना सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस…

वर्धा पोलिसांचे पथक लपत छपत गेले अन् १७ जणांना रंगेहाथ पकडले; पाहा नावे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!