भाऊ आणि वहिणीची हत्या करणारा चार तासात ताब्यात; हत्येचे कारण…
सातारा: आंधळी (ता. माण) गावात दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी दहिवडी पोलिसांनी फरारी आरोपीस अवघ्या चार तासात ताब्यात घेतले आहे. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने आपला सख्खा चुलत भाऊ आणि वहिनीची कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केल्याची माहिती चौकशीदरम्यान दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपीच्या मुलीवर एक-दीड वर्षांपूर्वी अत्याचाराची घटना घडली होती. खून झालेल्या दाम्पत्याच्या मुलावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या घटनेचा राग मनात धरून युवकाच्या संपूर्ण कुटुंबाला संपवणार असल्याचे आरोपी सतत बोलत होता. दाम्पत्याच्या खून प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावरच संशय व्यक्त करत त्याला ताब्यात घेतले आणि त्याने या गुन्ह्याची कबुली देखील दिली.
दरम्यान, रविवारी सकाळी माण तालुक्यात आंधळी येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर पूर्ण सातारा जिल्हाच हादरून गेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटना उघडकीस आल्यानंतर आरोपीला अवघ्या चार तासात अटकही केली. सख्खा चुलत भाऊ आणि भावजय ही दहा वाजण्याच्या सुमारास लाईट आल्यानंतर शेतात गेले असता आरोपी बापूराव पवार याने धारदार शस्त्राने त्यांच्यावर वार करून त्यांना ठार मारले होते.
दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर दहिवडीच्या पोलिस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे, सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर आणि दहिवडीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच घटनेचा पंचनामा केला. यावेळी श्वान पथकही पाचारण करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचेही कर्मचारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात लेकीचाही अपघाती मृत्यू; उदयनराजे यांची भावनिक पोस्ट…
दुसऱ्या विवाहाचे फोटो ठेवले स्टेटसला, पहिल्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या…
युवतीची बलात्कारानंतर आत्महत्या; फरार संशयिताचा आढळला मृतदेह…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…
प्रेयसीची गळा चिरून हत्या करणाऱ्या आरोपीचाही जंगलात शेवट…