अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…

मुंबईः बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याला मिळालेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने त्याच्या सुरक्षेत वाढ केली असून, Y+ स्कॉट सुरक्षा पुरवली आहे. शाहरुख खानला याआधी दोन पोलिस हवालदारांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्याशिवाय त्याच्यासोबत स्वत:चा सुरक्षा रक्षकही असायचा. मात्र आता उच्चाधिकार समितीच्या शिफारशीनंतर शाहरुख खानची सुरक्षा Y+ स्कोअरवर अपग्रेड करण्यात आली आहे.

शाहरुख खान आता राज्याच्या व्हीआयपी सुरक्षा युनिटच्या सहा प्रशिक्षित कमांडोच्या टीमसोबत दिसणार आहे. जे एमपी गन, एके-47 असॉल्ट रायफल आणि ग्लॉक पिस्तुलने सुसज्ज असतील. शाहरुखच्या सुरक्षेशिवाय त्याच्या घरावर चोवीस तास शस्त्रांसह मुंबई पोलिसांचे चार कर्मचारी पहारा देणार आहेत. शाहरुख खान कारने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाईल, त्यावेळी त्याच्या सुरक्षेखाली प्रशिक्षित कमांडो तसेच ट्रॅफिक क्लिअरन्स वाहन असेल. ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनामुळे शाहरुखच्या गाडीसमोर कोणीलाही येता येणार नाही. वाहतूक सुरळीत करण्यास हे वाहन मदत करेल.

दरम्यान, शाहरुख आधी काही महिन्यांपूर्वी सलमान खान याला देखील Y+ सुरक्षा पुरवण्यात आली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून येणाऱ्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता सलमाननंतर शाहरुखलादेखील Y+ स्कॉट सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

शाहरुख खान ‘पठाण’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याला धमक्याही दिल्या जात होत्या. ‘पठाण’ या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यामुळे शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे सरकारने अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ केली असून, Y+ Category Security देण्यात आली आहे.

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला पितृशोक…

अभिनेते धर्मेंद्र उपचारासाठी अमेरिकेला रवाना…

धक्कादायक शेवट! रविंद्र महाजनी काळाच्या पडद्याआड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!