महाराष्ट्र हादरला! शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं…

वाशिम : एका शिक्षकाला अज्ञात आरोपींनी अडवून लोखंडी रॉडने जबर मारहाण करून जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) मालेगाव तालुक्यातील कोल्ही बोर्डी रस्त्यावर घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर सुनील उर्फ दिलीप धोंडुजी सोनवणे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी ते दुचाकीवरून शाळेत निघाले होते. कोल्ही बोर्डी रस्त्यावर अज्ञात आरोपींनी अडवून त्यांना लोखंडी रॉडने जबर मारहाण केली व अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. त्यानंतर अज्ञात आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. मात्र, बराच वेळ ते गंभीर अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होते. त्यानंतर तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय वाशीम येथे दाखल करण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस, फॉरेन्सिक पथकाने प्रत्यक्ष स्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेज हाती लागले असून, दोन पथकांचे रवाना करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

Video: विद्यार्थ्याने लाइव्ह क्लासमध्ये शिक्षकाला मारले चपलेने; पण का?

शिक्षकाने स्वतःच्या जागी ठेवला रोजंदारीवर निवृत्त शिक्षक; वर्गातच जुगार…

विद्यार्थिनीला मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल…

शिक्षक कारचे पेढे वाटण्यासाठी गेले अन् कार कोसळली विहिरीत…

शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!