
पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
सोलापूर: एका सहाय्यक पोलिस निरीक्षकानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आनंद मळाळे असे आत्महत्या केलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
आनंद मळाळे हे सध्या नांदेड येथे सेवा बजावत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. पण, कामाचा ताण असल्यामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. मागच्या महिन्यात ते आजारी असल्यामुळे रजा घेऊन सोलापुरातील घरी आले होते. सदर बाजार पोलिस पुढील तपास करत आहेत.
आनंद मळाळे हे शनिवारी (ता. ७) पहाटे चारच्या सुमारास घराबाहेरील अंगणात गेले होते. त्यांनी आपल्या सर्विस रिवाल्वरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. घटनेच्यावेळी त्यांच्या पत्नी या घरातच होत्या. बाहेर येऊन त्यांनी पहिल्यानंतर आनंद मळाळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. घटनेची माहिती मिळताच सोलापूरचे पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त राजू मोरे आणि इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात रवाना केला.
आनंद मळाळे हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी होते. सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयमध्ये अनेक वर्ष पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. परीक्षा देऊन ते पोलिस उपनिरीक्षक झाले. त्यांनी सोलापूर शहर वाहतूक शाखा तसेच, सदर बाजार पोलिस ठाणे या ठिकाणी सेवा बजावली. त्यानंतर पुणे येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणून नांदेड येथे त्यांची पदोन्नती झाली होती.
टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…
पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वत:वरच झाडून घेतली गोळी…
पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…