
पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्याने विधवा महिलेकडे केली शरीर सुखाची मागणी…
पुणे : सफाई कामगार असलेल्या विधवा महिलेकडे शरीर सुखाची मागणी करुन जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक, ठेकेदारासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, ठेकेदार शिवाजी सुळ, आणि संजय वाघमारे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत बिबवेवाडीतील एका ४० वर्षाच्या महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ६४१/२३) दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहेत. असहाय व विधवा असल्याचे माहिती असताना मंगलदास माने याने त्यांच्याकडे शरीर सुखाची मागणी करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केली. शिवाय, पैशांची मागणी केली. त्या सुट्टीवरुन १० एप्रिल रोजी परत आल्यावर हजर होण्याची चिठ्ठी घेण्यासाठी ठेकेदार शिवाजी सुळ याच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्याने फिर्यादी यांना ‘तू माने साहेबांकडे जा, तुम्ही जातीवर जाणार’ असे बोलून जातीवाचक शिवीगाळ केली.
दरम्यान, याबाबत त्यांनी या दोघांविरुद्ध तक्रार अर्ज केला होता. हा अर्ज मागे घेण्यासाठी संजय वाघमारे याने धमकी दिली. पोलिसांनी अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस आयुक्त शिरगावकर पुढील तपास करीत आहेत.
पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्याची कोयत्याने वार करत हत्या…
हिट अँड रन! पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ अनेक वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू…
धक्कादायक! पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविकेवर बलात्कार…
पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…
पुणे हादरलं! कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीकडून मुलगी गर्भवती…