पुणे शहर व पिंपरी-चिंचवड क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना बक्षिस वितरण…
पुणेः 39 व्या पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धा 2023-24 चे 4 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेते खेळाडू व संघ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे उप-कुलगुरु प्रो. डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी पोलिस महासंचालक प्रविण दिक्षित, सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त, रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, अरविंद चावरिया तसेच पुणे पोलिस आयुक्त व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कार्यक्षेत्रातील इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धा शिवाजीनगर पोलिस मुख्यालय येथे पार पडल्या. यामध्ये हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल व कबड्डी इत्यादी स्वरूपाचे सांघिक खेळ, त्याचप्रमाणे वैयक्तिक स्वरूपाचे रनिंग, कुस्ती, ज्युडो, वेट लिफ्टिींग या खेळांचा समावेश होता. पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत सर्व पोलिस स्टेशन, शाखा तसेच मुख्यालय येथे नेमणूकीस असलेले पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार स्पॉक खेळाडू तसेच संघाची निवड करण्यात आली होती.
स्पर्धेत उत्कृष्ट अँथलेटीक्स म्हणून पुरुष गटामध्ये विकास इंगळे तसेच महिला गटामध्ये यामीनी ठाकरे या स्पर्धकाची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे 100 मिटर चावण्याच्या स्पर्धेमध्ये पुरुषामध्ये विकास इंगळे पुणे शहर व महिलामध्ये यामीनी ठाकरे पिंपरी चिंचवड यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पुरुषामध्ये शुभम दांडगे यांनी तसेच महिलांमध्ये रुपाली बंदीवाडेकर यांनी व्दितीय क्रमांक मिळविला. त्याचप्रमाणे सांघीक स्पर्धामध्ये सर्वसाधारण विजेतेपद मुख्यालय शिवाजीनगर या संघाने पटकाविले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी तर आभार पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे सह आयुक्त संजय शिंदे यांनी मानले.
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…