पत्नीचे अनैतिक संबंध अन् नवऱ्याची तालिबानी शिक्षा…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एक व्यक्ती नोकरी निमित्त मुंबईत राहात होता. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे गावी आल्यानंतर समजल्यावर त्याने पत्नीला झाडाला बांधून तालिबानी शिक्षा दिली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधील इब्राहिमपूर गावात ही घटना घडली आहे. यावेळी गावातील अनेक महिला उपस्थित होत्या. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नवऱ्याने पत्नीला झाडाला बांधलं, तिच्या तोंडाला काळं फासलं आणि नंतर तिचे केस कापले आणि चपलेचा हारही घातला. नवऱ्याने पत्नीसोबत हे सर्व पंचायतीच्या आदेशावरून केले आहे. पंचायतीच्या तालिबानी शिक्षेचे प्रकरण समोर आले आहे. पंचायतीच्या या आदेशामुळे गावात तणावाचे वातावरण पसरले आहे.

गावातील युवक लवकुशसोबत प्रेमसंबंध ठेवल्यामुळे पत्नीला तालिबानी शिक्षा दिल्याचा आरोप पतीने केला आहे. महिलेचे त्याच गावात राहणारा लवकुश नावाच्या युवकावर प्रेम होते. विवाहित महिलेला तीन मुले आहेत. मोठा मुलगा 12 वर्षांचा आहे. महिलेचा पती हरिलाल हा मुंबईत खासगी नोकरीला आहे. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा पतीला संशय होता. पती मुंबईहून परतल्यावर त्याने महिला आणि तिच्या प्रियकराला बोलताना पकडले होते. त्यानंतर गावची पंचायत झाली. या प्रेमीयुगुलाला तालिबानी शिक्षा देण्यात आली होती. पण, प्रियकराने पंचायतीच्या तावडीतून निसटून पोलिस ठाणे गाठले. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण पोलिस येणाऱ्यापूर्वीच महिलेचं तोंड काळं करून तिचे केस कापण्यात आले होते.

पोलिसांनी 22 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पती हरिलालसह 15 जणांना अटक केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय रॉय यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. गावात तणावाचे वातावरण पाहता पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.


पोलिसकाका Video News: २९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

चुलतीचे लहान पुतण्यासोबत जुळले प्रेमसंबंध अन् नको ते घडलं…

यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…

नात्याला काळीमा! अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समजताच आईला बसला धक्का…

पत्नी आणि प्रियकराचा नको त्या अवस्थेतच पतीने केला खून…

ऑनर किलिंग! अमितच्या ओरड्याचा हृदय पिळवटून टाकणारा आवाज; पाहा Video…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!