जळगाव रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू; केवळ अफवा ठरले कारण…
जळगाव: जळगावच्या परधाडे स्थानकाजवळ अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत. यात काही प्रवासी समोरून येणार्या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. आतापर्यंत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परधाडे स्थानकाजवळ आज (बुधवार) साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली […]
अधिक वाचा...कर्नाटकमध्ये भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू; मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश…
बेळगाव (कर्नाटक): उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुर नजीक ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार झाले आहेत. दुसऱ्या दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांसमवेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचीही दुर्घटना घडली. कर्नाटकच्या रायपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सिंधनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहन पलटी होऊन ही अपघाताची घटना घडली आहे. नरहरी मंदिरात पूजा करण्यासाठी विद्यार्थ्यांची कार […]
अधिक वाचा...वाशिम जिल्ह्यात तीन वाहनांमध्ये भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर…
वाशिम : वाशिम जिल्ह्यात रिक्षा आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघात तिघांचा मृत्यू तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कारंजा ते पोहा मार्गावरील तुळजापूर धरणाजवळ रिक्षा आणि पिकअप गाडी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला […]
अधिक वाचा...भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…
बीडः बीड-परळी मार्गावर आज (रविवार) पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या युवकांना भरधाव एसटी बसने चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही युवक पोलिस भरतीची तयारी करत होते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बालाजी मोरे, ओम घोडके आणि विराज घोडके अशी मृत युवकांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. बीड परळी महामार्गावर […]
अधिक वाचा...पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…
पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ आज (शक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स […]
अधिक वाचा...जामखेडमध्ये बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू; पाहा नावे…
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या जामवाडीत बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चारचाकी वाहनातील 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. विहिरीत वाहन कोसळल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पाण्यात बुडलेल्यांना विहिरीतून वर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चारही जणांचा मृत्यू झाला होता. अशोक विठ्ठल शेळके (वय […]
अधिक वाचा...महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या IT मधील युवतीचा अपघाती मृत्यू…
पुणे: दुचाकीवरून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या युवकाच्या मोटारसायकलला ट्रकची पाठीमागून धडक बसली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली युवती ट्रकखाली सापडल्याने जागीच मृत्युमुखी पडली तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातप्रकरणी मोहम्मद सलमान मोहम्मद कासीम शेख (वय २९) याच्या फिर्यादीनुसार ट्रकचालक सोनुकुमार नागेंद्रसिंग (रा. संगमनगर, वडाळा मुंबई) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुबल राजीवकुमार सिन्हा (वय […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…
नाशिक: नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलावर रविवारी (ता. १२) रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू तर 13 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील द्वारका उड्डाणपुलावर रविवारी रात्री आठ वाजता हा अपघात घडला. अपघातामध्ये मृत झालेले आणि जखमी झालेले सर्वजण सिडकोच्या सह्याद्रीनगर परिसरातील रहिवाशी होते. हे […]
अधिक वाचा...बीड जिल्ह्यातील आणखी एका सरपंचाचा गेला जीव; अपघात की घातपात?…
बीड: राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वाराला उडवले आहे. या अपघातात विद्यमान सरपंचाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरपंचाच्या मृत्यूनंतर अपघात की घातपात? अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर अपघात झाला असून ही धडक एवढी जोरात होती की या अपघातात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच […]
अधिक वाचा...जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे वाहन दरीत कोसळले; 4 जवान हुतात्मा…
श्रीगरः जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरामध्ये भारतीय लष्कराचे वाहन दरीत कोसळले असून, 4 जवान हुतात्मा झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि जवानांकडून घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे. उत्तर काश्मीर जिल्ह्यातील एसके पायनजवळ लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून दरीत कोसळ्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे यामध्ये दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस आणि […]
अधिक वाचा...
