हिट अँड रन! पुणे शहरातील झेड ब्रिजजवळ अनेक वाहनांना उडवले; एकाचा मृत्यू…

पुणे : पुणे शहरातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ शुक्रवारी (ता. ६) रात्री एका मद्यधुंद वाहन चालकाने एकामागे एक अनेक वाहनांना उडवले. शिवाय, रस्त्यावरुन चालणाऱ्या पदचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तसेच चार जण जखमी झाले आहेत. मद्यपान केलेल्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

उमेश हनुमंत वाघमारे (वय 48) आणि नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय 44) हे दोघे शुक्रवारी रात्री चार चाकी वाहनाने नारायण पेठ पोलीस चौककडून झेड ब्रिजकडे जात होते. दोघांनी मद्य प्राशन केले होते. त्यातील उमेश वाघमारे गाडी चालवत होता. भरधाव वेगाने गाडी चालवत त्याने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली. शिवाय, रस्त्याने जाणाऱ्या पदचाऱ्यांनाही धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तसेच चार जण जखमी झाले आहेत.

हिट अँड रन प्रकरणासारख्या या अपघातात भरधाव वेगाने जणाऱ्या वाहनाने 3-4 वाहनांना उडवले. त्यात दोन रिक्षांचा समावेश आहे. तसेच पादचाऱ्यांना धडक दिली. वाहन चालकाने धडक दिल्यामुळे एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच रिक्षा चालक इतर काही जखमी झाले.

संतोष माने प्रकरणाची आठवण…
पुणे शहरात 2012 मध्ये संतोष माने याने केलेल्या अपघात प्रकरणाची आठवण ताजी झाली. 25 जानेवारी 2012 मध्ये संतोष माने स्वारगेट स्थानकातून पीएमटीची बस काढली. वेगाने ही बस नेत रस्त्याने जाणाऱ्या अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला होता तर 37 जण जखमी झाले होते. संतोष माने हा पीएमटीत चालक होता.

पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार…

पुणे-नगर महामार्गावर PMPMLच्या दोन बस समोरासमोर धडकल्या; प्रवासी जखमी…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

जेजुरीवरून परतताना रिक्षा पडली विहिरीत; नवविवाहीत दाम्पत्यासह मुलीचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!