सॉफ्टवेअर इंजिनीअर युवती निर्वस्त्र अवस्थेत गेली मंदिरात अन्…

हैदराबाद: सॉफ्टवेअर इंजिनीअर तेजस्विनी निर्वस्त्र अवस्थेत मंदिरात गेली. मंदिरातून तिने देवी अम्मावरुची मूर्ती उचलली आणि जवळच असलेल्या तलावाजवळ गेली. मूर्ती घेऊन तिनं तलावात उडी घेतली. यानंतर तेजस्विनीचं शव सापडले आहे. पण मूर्ती अद्यापही गायब आहे. या प्रकरणातील गूढ वाढत चालले आहे. मेडिपल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, तेजस्विनी कपडे काढून जवळच असलेल्या एका मंदिराच्या दिशेनं धावली. तिथून तिनं देवी अम्मावारुची मूर्ती उचलली. यानंतर ती जवळच असलेल्या एका तलावाकडे गेली. याच मूर्तीसह तिनं तलावात उडी घेतली. तेजस्विनीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आंध्र प्रदेशच्या विजयनगरम जिल्ह्यात घडली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, मंदिरातील मूर्ती गायब असल्याचं लक्षात येताच या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. पोलिसांनी मूर्तीचा शोध सुरू केला. त्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तेव्हा त्यात धक्कादायक दृश्य दिसले. यातून युवतीची आत्महत्या आणि मंदिरात झालेली चोरी, अशा दोन्हींचा उलगडा झाला. तेजस्विनी मृत्यूच्या आधी मंदिरात गेली होती. त्यावेळी ती निर्वस्त्र अवस्थेत होती. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. त्याच अवस्थेत ती मंदिरात गेली. तिथून तिनं देवी अम्मावरुची मूर्ती उचलली. यानंतर ती जवळच असलेल्या तलावाजवळ गेली. मूर्ती घेऊन तिनं तलावात उडी घेतली.

डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सनं तलावातून मूर्ती शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकरणाच्या तपासात मूर्ती हा महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता असल्याचं तपासकर्त्यांना वाटतं. या प्रकरणी पोलिसांनी तेजस्विनीची आई अरुणाची चौकशी केली आहे. तेसस्विनीच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घडामोडी जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. तेजस्विनी एका फ्लॅटमध्ये भाड्यानं राहत होती. त्या फ्लॅटचं भाडं १ लाख रुपये होतं, अशी माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

विवाहितेने प्रियकराच्या मदतीने काढला नवऱ्याचा काटा, सीसीटीव्हीने भांडाफोड…

धक्कादायक! डॉ. नवरा मृतावस्थेत तर मुलगा रक्तबंबाळ अन् पत्नी मोबाईलमध्ये व्यस्त…

नाशिकमध्ये युवतीची भररस्त्यात सपासप वार करत हत्या…

कोल्हापूरमध्ये प्रेमविवाहाचा भयानक शेवट; संशयावरून पत्नीला संपवलं अन् मारला मिशीवर ताव…

वर्षभरापूर्वी विवाह! तू काही कामाचा नाहीस, पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!