
हृदयद्रावक! बहिणीच्या डोळ्यादेखत लहान भावाला ट्रकने चिरडलं…
पंढरपूर : पंढरपूर-सातारा मार्गावर भरधाव ट्रकने दोन विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा या घटनेत जागेवरच मृत्यू झाला आहे. तर, गंभीर जखमी झालेल्या सहावीतील मुलीला मिरज येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
पंढरपूर-सातारा रोडवर धोंडेवाडी पाटीजवळ हा अपघात घडला. अपघातातील दोघेही बहीण-भाऊ होते. दोघेही सकाळी शाळेत जात असताना ही घटना घडली आहे. राधिका धनाजी देठे आणि चैतन्य धनाजी देठे हे लहान भाऊ आणि बहीण सकाळी नेहमीप्रमाणे सायकलीवर शाळेला निघाले होते. यावेळी सिमेंट बल्करने ट्रकने पाठीमागून येऊन धडक दिली. धडक बसल्यानंतर दोघेही चाकाखाली सापडले. पण, या अपघातात चैतन्य हा पाचवीत शिकणारा मुलगा जागीच मृत झाला आहे. तर त्याची सहावी शिकणारी मोठी बहीण राधिका ही गंभीर जखमी झाली आहे.
स्थानिकांनी अपघातानंतर घटनास्थळी धाव घेऊन राधिकाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला उपचारासाठी मिरज येथे हलविण्यात आले आहे. संतप्त जमावाने ट्रक अडवला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. या अपघातात देठे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात छोट्या भावाने प्राण गमावले आहेत, तर बहिणीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
हृदयद्रावक! तीन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू…
हृदयद्रावक! गतीमंद मुलीला वेदना असह्य होत असल्याने गुंगीच्या गोळ्या देऊन मारलं अन्…
हृदयद्रावक Video! बहिणीच्या लग्नात नाचताना युवतीचा मृत्यू…
हृदयद्रावक! महिलेचा पदर दुचाकीच्या चाकात अडल्याने अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! आई रक्ताच्या थारोळ्यात अन् चिमुकला मृतदेहाला बिलगलेला…

