हृदयद्रावक! मुलीचा फोन पोलिस अधिकाऱ्यांनी उचलला अन् बसला धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश) : रेल्वेमधून सिलेंडर घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या चुकीमुळे आगीचा भडका उडाला आणि 10 जणांची होरपळून जीव गमावला. यामध्ये नात आणि आजीला जीव गमवावा लागला आहे. लखनौ येथून रामेश्वरमला निघालेल्या भारत पर्यटक रेल्वेने शनिवारी सकाळी 5:15च्या सुमारास पेट घेतला. प्रवाशांनी जिवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, 10 जणांना जीव गमवावा लागला. हिमानी […]
अधिक वाचा...Video: लघनऊ-रामेश्वर रेल्वेला भीषण आग; नऊ प्रवाशांचा मृत्यू तर…
चेन्नई (तामिळनाडू): मदुराईमध्ये लघनऊ-रामेश्वर या रेल्वे गाडीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून, यामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवली तेव्हा आग लागली आहे. त्यानंतर काही प्रवाशांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर […]
अधिक वाचा...रेल्वेचा पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू…
नवी दिल्ली: मिझोरामची राजधानी ऐजॉलजवळ निर्माणाधीन रेल्वे पूल कोसळल्याने 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही 30 ते 40 मजूर अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मजुरांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही सांगितले जात आहे. राजधानी आयजोलपासून २१ किमी अंतरावर बांधकाम सुरू असलेला पूल कोसळून ही दुर्घटना घडली […]
अधिक वाचा...Video: पत्नीला धक्का लागला म्हणून मारहाण; युवक रुळावर पडला अन् क्षणात…
मुंबईः पत्नीला धक्का लागल्याने रागाच्या भरात दाम्पत्याने एका युवकाला मारहाण केली. या मारहाणीत युवक रेल्वे मार्गावर पडल्याने रेल्वेच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनेश राठोड (रा. घणसोली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी दादर रेल्वे पोलिसांनी अविनाश माने आणि शीतल अविनाश माने या दाम्पत्याला अटक केली असून, पोलिस तपास करत आहेत. […]
अधिक वाचा...RPF शिपाई चेतन सिंह याने बुरखा घातलेल्या महिलेला बंदुकीच्या धाकावर…
मुंबई : मुंबई-जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चार जणांची हत्या करणारा आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने एका बुरखा घातलेल्या महिलेला बंदुकीच्या धाकावर ‘जय माता दी’ म्हणण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या बोरिवलीच्या जीआरपीला त्या महिलेने आपला जबाब दिल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF जवान चेतन सिंह याने […]
अधिक वाचा...हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
पाटणा (बिहार) : हनीमूनसाठी दार्जिलिंगला निघालेली पत्नी रेल्वे प्रवासादरम्यान बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिला शॉपिंग करताना पकडले आहे. आता तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रिन्स कुमार आणि काजल अशी या घटनेतील नवरा-बायकोची नावे आहेत. लग्नानंतर दोघे बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक्स्प्रेसने हनीमूनला निघाले होते. मात्र, वॉशरूमच्या बहाण्याने गेलेली बायको परत आलीच नव्हती. प्रिन्सने याविरोधात पोलिसांत […]
अधिक वाचा...RPF आरोपीचा अजब दावा; रेल्वेमधील हत्याकांडाचा घटनाक्रम…
मुंबई : मुंबई-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये सोमवारी (ता. 31) गोळीबाराची घटना घडली. आरपीएफ शिपायाने गोळीबारात आपलाच सहकारी आणि तीन प्रवाशांचा जीव घेतला. या प्रकरणी आरोपीला आरपीएफ शिपायाला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरपीएफ शिपाई अमेय घनश्याम आचार्य (वय 26) यांनी आपल्या जबाबात ट्रेनमध्ये पहाटे घडलेला घटनाक्रम कथन केला. आरपीएफ सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक […]
अधिक वाचा...जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये गोळीबार करणाऱ्याने मित्राला सांगितले होते की…
मुंबई: जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये पालघरजवळ एका आरपीएफ जवानाने आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास अधिकाऱ्यासह ३ प्रवाशांवर गोळीबार केला. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. आरोपी चेतन या जवानाला बोरिवली पोलिसांनी अटक केली असून, तपासादरम्यान गोळीबाराचे कारण समोर आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सिनिअर एएसआय टीकाराम मीणा मूळचे राजस्थानच्या सवाई माधोपूरचे रहिवासी होते. त्यांची […]
अधिक वाचा...जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF कॉन्स्टेबलकडून गोळीबार, चार जणांचा मृत्यू…
मुंबई : जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमारास RPF कॉन्स्टेबलने केलेल्या गोळीबारात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी चेतन सिंह या आरपीएफ कॉन्स्टेबला ताब्यात घेतले आहे. जयपूर एक्स्प्रेस ट्रेन राजस्थानमधून महाराष्ट्रातील पालघरमध्ये दाखल होताच या ट्रेनमध्ये गोळीबार झाला. गोळीबारात चार जण जागीच ठार झाले असून, काही प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची […]
अधिक वाचा...हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…
पाटणा (बिहार): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर पती-पत्नी हनिमूनसाठी निघाले होते. पण, प्रवासादरम्यान नवरी बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नवविवाहित दांपत्य दिल्लीवरून न्यू जलपैगुडी येथे हनिमूनसाठी निघाले होते. आनंद विहार स्टेशनवरून निघालेल्या या ट्रेनमध्ये मुझफ्फरपूर स्टेशन येथून प्रवासासाठी निघाले होते. पण, प्रवासादरम्यान […]
अधिक वाचा...