सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…

पाटणा (बिहार) : मुलीने वडिलांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने आणि भावाने लग्नाच्या 3 वर्षांनंतर संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला. या घटनेत तिघांना जीव गमवावा लागला आहे. ऑनर किलिंगची घटना घडली असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातल्या गोपालपूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नवटोलिया गावात मंगळवारी (ता. 9) हत्याकांडाची घटना घडली आहे. चंदन कुमार (वय 40), त्याची पत्नी चांदनी कुमारी उर्फ चंदा कुमारी आणि त्यांची दीड वर्षाची मुलगी रोशनी कुमारी अशी मृतांची नावे आहेत. चंदा कुमारीचे वडील प्रमोद सिंह उर्फ पप्पू सिंह आणि भाऊ धीरज सिंह यांनी त्यांची हत्या केली. पोलिस पिता-पुत्रांचा शोध घेत आहेत.

चंदन कुमार आणि चंदा कुमारी यांनी 2021 मध्ये पळून जाऊन लग्न केले होते. त्यानंतर त्यांना एक मुलगी झाली. काही दिवसांपूर्वी चंदन कुमार कुटुंबाला घेऊन घरी परत आला होता. गावातल्या जुन्या घरी आई-वडिलांना भेटून नव्या घरी ते जात असतानाच पप्पू सिंह आणि भावाने तिघांना बंदुकीची गोळी मारून त्यांची हत्या केली. पोलिस अधीक्षक सुशांत कुमार सरोज घटनास्थळी पहाणी करून माहिती दिली. ते म्हणाले, ‘मुलीच्या वडिलांनी आधी रॉडने त्यांच्या डोक्यात मारले, नंतर मुलीचा भाऊ आला व त्याने तिघांवर गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा मृत्यू झाला. आरोपींना अटक करण्यासाठीही पोलिसांनी छापासत्र सुरू केले आहे. पप्पू सिंह यांची मुलगी चंदा कुमारी हिनं गावातले निवृत्त शिक्षक गणेश प्रसाद सिंह यांचा मुलगा चंदन कुमार याच्याशी प्रेमविवाह केला. दोघंही एकाच जातीचे होते, तरीही पप्पू सिंह यांना हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी अखेर अशा पद्धतीने हे नाते संपवले आहे.’

प्रेम विवाह! मित्राने फोन करून दिली पत्नीबाबतची धक्कादायक माहिती अन्…

सैराटची पुनारवृत्ती! आर्ची-परशासारखेच दोघांना संपवलं…

सैराटची पुनरावृत्ती! दोन सख्या भावांनी बहिणीची कुऱ्हाडीने केली हत्या…

सख्खा भाऊ बनला पक्का वैरी! संतपत्तीवरून दोन बहिणींची केली हत्या…

दुबईवरून प्रेयसी आल्याचे पाहताच कुलूप लावून ठोकली धूम…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!