Video: रशियन युवती अचानक चालकाच्या मांडीवर येऊन बसली अन् सुटलं कंट्रोल…

रायपूर (छत्तीसगड): रशियन युवती आणि युवक दोघंही नशेत कार चालवत होते. प्रवासादरम्यान अचानक युवती युवकाच्या मांडीवर येऊन बसल्यामुळे अपघात झाला. यामध्ये तीन युवक जखमी झाले आहेत. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे.

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये ही घटना घडली आहे. व्हिडीओत पाहायला मिळते की, एक युवती दारूच्या नशेत भर रस्त्यात गोंधळ घालताना दिसत आहे. पोलिसांशी ती हुज्जत घालत आहे. तिचा सहकारी पोलिसांना समजावताना दिसत आहे. रायपूरमध्ये गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या रस्ते अपघातानंतरचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओसोबत एक मेसेजही व्हायरल होत आहे. यात ती युवती रशियन असल्याचे सांगितले जात आहे. मित्राच्या मांडीवर बसून ती कार चालवत होती. त्याचवेळी गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार एका दुचाकीला धडकल्याची माहिती पुढे आली आहे.

स्कूटीवरून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात कार चालवणाऱ्या या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: महिला प्राध्यापिकेने वर्गातचं केलं विद्यार्थ्याशी लग्न…

Video: युवतीच्या ओठांचं चुंबन घेतल्यानंतर उदित नारायण म्हणाले…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…

Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!