
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मिळाला महत्त्वाचा पुरावा…
भोपाळ (मध्य प्रदेश) : इंदोर येथील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मोठा ट्वीस्ट आला आहे. मेघालय पोलिसांनी मंगळवारी राजाची हत्या झाली, त्या ठिकाणी सीन रीक्रिएशन केला. यामध्ये त्यांच्या हाती महत्त्वाचा पुरावा लागला आहे. त्यामुळे आता सोनम, राज आणि इतर आरोपींचा पाय आणखी खोलात गेला आहे.
राजा रघुवंशी यांच्या हत्येसाठी वापरलेला दुसरा डाओ (माचेट) राज्य आपत्ती प्रतिसाद दलाने (एसडीआरएफ) जप्त केला. पाचही आरोपींनी राजाच्या हत्येत दोन डाओ वापरल्याची कबुली दिली. पहिला डाओ 2 जून रोजी जप्त करण्यात आला, तर दुसरा डाओ हत्येनंतर त्याच ठिकाणी फेकून दिला होता. आरोपीने राजाची हत्या केल्यानंतर त्याच ठिकाणी स्टीलच्या हँडलसह दुसरे शस्त्र टाकले होते. एसडीआरएफ पथकाने घटनास्थळी सखोल शोध मोहीम राबवली. त्यानंतर दुसरा डाओ जप्त करण्यात यश मिळाले.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात आतापर्यंत एकाच शस्त्राचा वापर झाल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर पोलिसांनी सीन रीक्रिएशनच्या वेळी दुसरं शस्त्र सापडले आहे. या डाओला आता फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. राजाच्या हत्या प्रकरणाच्या तपासात दुसरे डाओ सापडणे हे अतिशय महत्त्वाचे समजलं जात आहे. आरोपींविरोधात भक्कम पुरावे जमा केले जात आहेत. त्यात आता या दुसऱ्या डाओमुळे आणखीच भर पडली आहे.
राजाला उंबलाई येथील रियात अरलियांग पार्किंग लॉटमध्ये बोलावले आणि तिथे त्याची आरोपींनी हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतदेह वैसावडोंग धबधब्याजवळील एका खोल खड्ड्यात फेकून दिला. पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून, चौकशी सुरू आहे. आरोपींनी त्यांचा गुन्हा कबूल केला आहे आणि पोलिसांना हत्येची सविस्तर माहिती दिली आहे. पोलिस आता आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्याची तयारी करत आहेत.
नवा ट्विस्ट! सोनमने नवऱ्यासमोर शरीरसंबंधासाठी ठेवली होती एक अट…
धक्कादायक! पतीच्या हत्येनंतर सोनमने घालवली प्रियकरासोबत रात्र…
सोनमचे होते नोकरावर प्रेम अन् हनिमूनवेळी केला नवऱ्याचा गेम; पाहा टाईमलाईन…
राजा आणि सोनम रघुवंशी हनिमून प्रकरणी धक्कादायक खुलासा; सोनमला अटक…
नेत्याला रंगेहाथ पकडलं; माझ्याशी लग्न करून दुसऱ्याबरोबर मजा करतोस…
नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ…
रांजणगाव तिहेरी हत्याकांडाचं गूढ उलगडलं! दाजीच्या भावासोबत प्रेमसंबंध जुळलं अन्…
हनिमूनच्या रात्री नवरी म्हणाली मला बॉयफ्रेंड आहे, हात लावायचा नाही…
हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम…

