प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळली…

जालना : संभाजीनगर-जालना रोडवर बसला सोमवारी (ता. २५) मध्यरात्री भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस मध्यरात्री पुलावरुन कोसळल्याने बसमधील 25 प्रवासी जखमी झाले आहेत. संभाजीनगर ते जालना रोडवर मध्यरात्री ही घटना घडली. एक खाजगी बस पुलावरुन खाली कोसळल्यामुळे 25 प्रवासी जखमी झाले आहेत. तर, चार जण गंभीर आहेत. पूजा ट्रव्हल्सची ही बस होती. ही बस […]

अधिक वाचा...

जादूटोण्याच्या संशय! वृद्धाच्या अंगावर झोपेतच ॲसिड टाकून केली हत्या…

जालना : जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी या वृद्धाच्या अंगावर रात्री झोपेतच अॅसिड टाकले होते. गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. श्रीरंग हरीबा शेजूळ (वय 85, म्हसरूळ, ता.जाफराबाद) असे मृत वृद्धाचे नाव आहे. जाफराबाद तालुक्यातील […]

अधिक वाचा...

जालना जिल्ह्याचे शैलेश बलकवडे नवे पोलिस अधीक्षक; पदभार स्वीकारला…

जालना: जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या जागेवर शैलेश बलकवडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सूत्रे स्वीकारली आहेत. आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांनी यापूर्वी गोंदिया, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर येथे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्य सरकारने […]

अधिक वाचा...

जालना जिल्ह्यात सोमवारपासून जमावबंदीचे आदेश लागू…

जालना: जालना जिल्ह्यात सोमवारी (ता. ४) सकाळी 6 वाजल्यापासून 17 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश देण्यात आला आहे. अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी यासंबंधिचे आदेश दिले आहेत. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर परिस्थिती बिघडल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हे आदेश लागू केले आहेत. जमावबंदीच्या आदेशामुळे जालन्यात मराठा आरक्षणाच्या निमित्ताने विविध संघटनाकडून आत्मदहन, उपोषण, […]

अधिक वाचा...

जालना जिल्ह्याचे एसपी तुषार दोषी सक्तीच्या रजेवर…

जालनाः जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जालना प्रकरणात ही पाहिली कारवाई समजली जात आहे. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे या घटनेच्या विरोधात राज्यभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर लाठीमार […]

अधिक वाचा...

जालना लाठीचार्ज प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसही जखमी…

जालना : जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा आक्रोश मोर्चाचे आरक्षणासाठी उपोषण सुरू असताना पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना घडली. यामुळे एकच एक गोंधळ उडाला आहे. तर, गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केल्याचा दावा करण्यात येत आहे. दगडफेकीत 37 पोलिस जखमी झाले असून, यामध्ये महिला पोलिसांचाही समावेश आहे. अंतरवाली सराटी प्रकरणी 350 मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल […]

अधिक वाचा...

मी मेल्यावर तू रडशील का? असे स्टेटस ठेवून घेतला जगाचा निरोप…

जालना : एका युवकाने ‘मी मेल्यावर तू रडशील का?’ असे स्टेटस ठेवून एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रांजणी येथे घडली आहे. विलास मोरे असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. विलास हा चहाची टपरी चालवून उदरनिर्वाह करत होता. मात्र, अचानक त्याने स्टेटस ठेवत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने ‘मी मेल्यावर तू रडशील […]

अधिक वाचा...

नम्रताच्या अकाली निधनामुळे गावावर पसरली शोककळा…

जालना: नळाचं पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून विद्यार्थीनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोकरदन शहरात घडली आहे. नम्रता संदीप सुरडकर असे या मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. नम्रताच्या अकाली मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. नळाला आज सकाळी पाणी आल्यानंतर नम्रताने पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर सुरू केली. नम्रता नळावरून पाणी भरत होती. याचदरम्यान तिचा तिथे पडलेल्या इलेक्ट्रिक […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!