नाशिकमध्ये भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू; 3 गंभीर जखमी…

नाशिक : कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदगाव-चाळीसगाव रस्त्यावरील पिंपरखेड टोल नाका परिसरात हा अपघात झाला. जखमींना ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

भाऊसाहेब माळी, लंकाबाई माळी (रा.नाग्या-साक्या) असे अपघातातील मृत पती-पत्नीचे नाव आहे. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला असलेल्या नाल्यात फेकली गेली आहेत. पिंपरखेड टोल नाका परिसरात दुचाकी आणि चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात पाठवले. मात्र, अपघातातील पती-पत्नीला उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. जखमींवर उपचार सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार दोन्हीही वाहने वेगात धावत होती. त्यामुळे अपघात झाल्यानंतर दुचाकी व कारही नाल्यात जाऊन पडली. कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने नांदगाव परिसरातील शोककळा पसरली असून, मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…

पुणे शहरातील नवले पुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; पाहा जखमींची नावे…

पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…

हृदयद्रावक! नाशिकमध्ये अपघातात ८ जणांचा मृत्यू; पाहा नावे; स्टेटस टाकलं अन्…

नाशिकमध्ये पत्नीसोबत प्रवास करणाऱ्या पतीची धावत्या रिक्षातून पुलावरून उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!