टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या कारला अपघात…

कोलकाता : टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या कारला दुर्गापूर एक्स्प्रेस वेवर दंतनपुरा भागात अपघात झाला आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सौरव गांगुली बर्धवान येथे जात होते. सुदैवाने त्यांना काही झालेले नाही.

दंतनपुराजवळ एक ट्रक अचानक गांगुलीच्या ताफ्याच्या समोर आल्यामुळे कार चालकाला अचानक ब्रेक लावावा लागला. त्यामुळे मागून येणाऱ्या भरधाव कार एकमेकांना आदळल्या. त्यातील एक कार गांगुलीच्या कारला धडकली.

सौरव गांगुलीच्या मागे असलेल्या कारने त्याच्या रेंज रोव्हरलाही धडक दिली. मात्र, गाडीचा वेग जास्त असल्याने कोणतीही जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही. मात्र, ताफ्यातील दोन वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातानंतर, सौरव गांगुलीला एक्सप्रेसवेच्या बाजूला सुमारे 10 मिनिटे वाट पहावी लागली. त्यानंतर सौरव गांगुली पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाला.

दरम्यान, सौरव गांगुली हा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे. त्याशिवाय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. टीम इंडियाचा आक्रमक आणि प्रभावी कर्णधार म्हणून सौरव गांगुलीची ओळख आहे. टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वात अनेक ऐतिहासिक विजय मिळवले आहेत.

क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याच्या विरुद्ध अटक वॉरंट जारी…

क्रिकेटपटूने दोन खणखणीत चौकार मारले अन् घेतला जगाचा निरोप…

माजी क्रिकेटपटू सलील अंकोला याच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह…

Video: क्रिकेटपटू विनोद कांबळी याची दुरावस्था; चालताही येईना…

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!