Video: प्रवासी विमान आणि हेलिकॉप्टरची भीषण धडक; 60 ठार…

न्यूयॉर्क: अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ अमेरिकन एअरलाइन्सचे प्रवासी विमान हवेत असताना, या विमानाला सैन्याचे हेलिकॉप्टर धडकले आहे. अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. संबंधित अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विमान आणि हेलिकॉप्टर अपघातानंतर नदीत कोसळून पडले आहेत. अपघातग्रस्त झालेलं प्रवासी विमान रीगन विमानतळावर लँड करत होते, याचवेळी समोरून […]

अधिक वाचा...

Video: हिंजवडीत सिमेंट मिक्सरखाली चिरडून दोन आयटी इंजिनियर युवतींचा मृत्यू…

पुणे : पुणे शहरातील हिंजवडी परिसरात सिमेंट मिक्सरने दोन आयटी इंजिनियर युवतींना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. हिंजवडी भागात मान रस्त्यावरील वडजाई नगर कॉर्नर येथे शुक्रवारी (ता. २४) दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला. हिंजवडीत भरधाव जाणारा डंपर (रेडीमिक्स) वळण घेत असताना अचानक पलटी […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील नवले पुलाजवळ भीषण अपघातात दोघांचा मृत्यू; पाहा जखमींची नावे…

पुणे: पुणे शहरातील नवले पुलावर आज (शनिवार) पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू आहे. स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या बसला पाठी मागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची घटना घडताच आसपासच्या लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या तरुणांची सुटका केली. […]

अधिक वाचा...

जळगाव रेल्वे अपघातात ११ जणांचा मृत्यू; केवळ अफवा ठरले कारण…

जळगाव: जळगावच्या परधाडे स्थानकाजवळ अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत. यात काही प्रवासी समोरून येणार्‍या रेल्वेखाली चिरडले गेले आहेत. आतापर्यंत ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. परधाडे स्थानकाजवळ आज (बुधवार) साडेचारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुष्कप एक्स्प्रेस मुंबईला चालली […]

अधिक वाचा...

कर्नाटकमध्ये भीषण अपघातात १५ जणांचा मृत्यू; मृतांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश…

बेळगाव (कर्नाटक): उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापूर तालुक्यातील गुळ्ळापुर नजीक ट्रक पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार झाले आहेत. दुसऱ्या दुर्घटनेत 3 विद्यार्थ्यांसमवेत 4 जणांचा मृत्यू झाल्याचीही दुर्घटना घडली. कर्नाटकच्या रायपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सिंधनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी वाहन पलटी होऊन ही अपघाताची घटना घडली आहे. नरहरी मंदिरात पूजा करण्यासाठी विद्यार्थ्यांची कार […]

अधिक वाचा...

वाशिम जिल्ह्यात तीन वाहनांमध्ये भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर…

वाशिम : वाशिम जिल्ह्यात रिक्षा आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघात तिघांचा मृत्यू तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कारंजा ते पोहा मार्गावरील तुळजापूर धरणाजवळ रिक्षा आणि पिकअप गाडी यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला […]

अधिक वाचा...

भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…

बीडः बीड-परळी मार्गावर आज (रविवार) पहाटे व्यायाम करण्यासाठी गेलेल्या युवकांना भरधाव एसटी बसने चिरडले. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे तिघेही युवक पोलिस भरतीची तयारी करत होते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बालाजी मोरे, ओम घोडके आणि विराज घोडके अशी मृत युवकांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. बीड परळी महामार्गावर […]

अधिक वाचा...

पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…

पुणे: पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळ आज (शक्रवार) सकाळी दहाच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली असून, नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोराची धडक दिली. चेंडू प्रमाणे ही मॅक्स ऑटो पुढे फेकली गेली. पुढं एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याच एसटीवर जाऊन ही मॅक्स […]

अधिक वाचा...

जामखेडमध्ये बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चौघांचा मृत्यू; पाहा नावे…

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेडच्या जामवाडीत बोलेरो कार विहिरीत कोसळल्याने चारचाकी वाहनातील 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जामवाडी गावावर शोककळा पसरली आहे. विहिरीत वाहन कोसळल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पाण्यात बुडलेल्यांना विहिरीतून वर काढण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चारही जणांचा मृत्यू झाला होता. अशोक विठ्ठल शेळके (वय […]

अधिक वाचा...

महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या IT मधील युवतीचा अपघाती मृत्यू…

पुणे: दुचाकीवरून महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघालेल्या युवकाच्या मोटारसायकलला ट्रकची पाठीमागून धडक बसली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली युवती ट्रकखाली सापडल्याने जागीच मृत्युमुखी पडली तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातप्रकरणी मोहम्मद सलमान मोहम्मद कासीम शेख (वय २९) याच्या फिर्यादीनुसार ट्रकचालक सोनुकुमार नागेंद्रसिंग (रा. संगमनगर, वडाळा मुंबई) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुबल राजीवकुमार सिन्हा (वय […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!