
क्लिनर अपहरण प्रकरण! मनोरमा खेडकरने मिळवला परस्पर अटकपूर्व जमीन…
मुंबईः एका क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असलेली मनोरमा खेडकर हिने वकिलासोबत थेट न्यायालयात हजेरी लावून अटकपूर्व जामीन मिळवला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा नवी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांकडेच तिच्या न्यायालयात हजेरी लावण्याची माहिती नव्हती, असे स्वतः पोलिसांनीच स्पष्ट केले आहे.
दिलीप खेडकरने नवी मुंबईतून एका क्लीनरचे अपहरण केल्यानंतर रबाळे पोलिस तपासासाठी थेट पुण्यातील बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या बंगल्यावर पोहोचले होते. त्यावेळी मनोरमा खेडकरने पोलिसांना, “तुम्ही पोलिस स्टेशनला जा, मी नवऱ्याला घेऊन येते,” असे आश्वासन दिले होते. पोलिसांनी तिच्या शब्दांवर विश्वास ठेवला. मात्र त्यानंतर दिलीप व मनोरमा खेडकर दोघेही पसार झाले होते.
दरम्यान, खेडकर दाम्पत्याच्या प्रकरणांत पोलिसांचा तपास अनेकदा संशयास्पद ठरल्याचे दिसून आले आहे. UPSC फसवणूक प्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांचने पूजा खेडकरविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, ती दीड वर्षे पोलिसांना सापडलीच नाही. मनोरमा आणि दिलीप खेडकर यांनी एका शेतकऱ्याला धमकावल्याचे प्रकरणही समोर आले होते. त्यावेळी दिलीप खेडकरला अटकपूर्व जामीन मिळाला होता, तर मनोरमा खेडकर मात्र बराच काळ पोलिसांच्या हाताशी लागली नव्हती. क्लीनरच्या अपहरण प्रकरणात गुन्हा दाखल असूनही मनोरमा खेडकर थेट न्यायालयात पोहोचते आणि पोलिसांना चकवा देत अटकपूर्व जामीन मिळवला आहे.
पोलिसांनी घरी येऊन दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. उलट, पोलिसांवर घरातील कुत्रे सोडले, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. काही वेळानंतर प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मात्र याच दरम्यान, दिलीप खेडकर दुसऱ्या रस्त्याने पळून गेल्याची माहिती समोर आली होती.
निलंबित IAS पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल…
पूजा खेडकरच्या बंगल्याच्या गेटवर चढून पोलिस शिरले घरात…
पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या रुग्णालयातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…
मोठी कारवाई! पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ…
बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांचा मोठा दावा…
पूजा खेडकर हिला न्यायालयाकडून मोठा दिलासा…
बडतर्फ IAS पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव…
बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…
UPSC कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर नॉट रिचेबल…
दिल्ली क्राईम ब्रँचने IAS पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा केला दाखल…
मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…
पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक
IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…
IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…
IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…
IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…
IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…
IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…
IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…
IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…
ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

