धक्कादायक! ग्राईंडरमध्ये शर्ट अडकला अन् युवक कोबीसारखा चिरला गेला…

मुंबई: वरळी येथील नरिमन भाट नगर परिसरात खाद्यपदार्थांच्या फॅक्टरीत चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरवर काम करताना एका कर्मचाऱ्याचा शर्ट अडकून तो आत ओढला गेला. या घटनेत सूरज यादव (वय 19) या युवकाचा मृ्त्यू झाला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे.

या प्रकरणी दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळे एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा मालकावर दाखल करण्यात आला आहे.

सूरज यादव याचा चुलत भाऊ महेश यादव याने दिलेल्या तक्रारीनुसार, चायनीज भेळ आणि भजी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल ग्राईंडर मशिनवर तयार केला जातो. हे मशिन नरिमन भाटनगर येथील एका खोलीत ठेवले होते. सचिन यांनी सूरजला कच्चा माल आणण्यासाठी ग्राईंडर असलेल्या खोलीकडे पाठवले. सूरज मशिनमधून माल काढत असताना मशिनमध्येच अडकला. या संदर्भातील माहिती मिळताच सचिन कोठेकर आणि इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने सूरजला मशिनमधून बाहेर काढले. गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत त्याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. पोलिसांनी सूरजचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून पुढील तपास करत आहेत.

Cyber Crime! पोलिसकाकाच्या खात्यातून 2.3 लाख गायब; कसे गेले पाहा…

वृद्धाला अनैतिक संबंध पडले महागात; लुट-लुट लुटलं अन् शेवटी…

Video: टॅक्सीत विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या…

लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…

व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा फर्दाफाश, तीन रशियन महिलांसह…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!