IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावल्या बद्दल पुणे पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी गाडीवर “महाराष्ट्र शासन” अशी पाटी देखील लावली होती. याप्रकरणी देखील पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे समजते.

पूजा खेडकर यांची नियुक्ती वादात सापडली असून पुण्यात कार्यरत असताना खासगी गाडीवर त्यांनी सरकारी लाल दिवा लावला होता. बोगस प्रमाणपत्रांच्याआधारे युपीएससी परीक्षेतून अधिकारी झाल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर होत आहे. पुण्यात प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी असताना त्यांनी विनापरवाना स्वत:च्या खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावला, तसेच कारवर महाराष्ट्र शासन ही पाटीही लावली होती. त्यामुळे, त्यांच्यावर पुणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. पूजा खेडकर यांचा पुण्यात प्रोबेशनरी पदावर असतानाचा रुबाब, थाट, श्रीमंताचा दिखावा त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. त्यांनी स्वत:च्या ऑडी कारवर लाल दिवा लावून प्रशासकीय रूबाबही दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आता, याप्रकरणी पोलिस अॅक्शन मोडवर असल्याचे दिसून येत आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पूजा खेडकर यांची युपीएससी परीक्षेतून निवड झाली असून सध्या त्या महाराष्ट्र केडरच्या 2022 च्या बॅचमधील IAS अधिकारी आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची पुण्यात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, या काळातील पूजा खेडकर यांचा रुबाब जिल्हाधिकाऱ्यांनाही लाजवणार होता. प्रोबेशनरी अधिकाऱ्यासाठी स्वतंत्र केबिन किंवा गाडीची सुविधा नसते. मात्र, पूजा खेडकर या स्वत:च्या खासगी ऑडी गाडीवर लाल-निळा दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी नेमप्लेट लावून फिरायच्या. याशिवाय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावून पूजा खेडकर यांनी तिकडे स्वत:चे कार्यालय थाटले होते. या कार्यालयातील फर्निचरही पूजा खेडकर यांनी बदलले होते. अखेर पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र लिहून त्यांच्या बदलीची शिफारस केल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला होता. त्यानंतर, आता पुणे पोलिसांकडून त्यांनी स्वत:च्या कारवर लाल दिवा लावल्याप्रकरणी कारवाई करणार आहेत.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावल्या बद्दल पुणे पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी गाडीवर “महाराष्ट्र शासन” अशी पाटी देखील लावली होती. याप्रकरणी देखील पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे समजते. मोटर वाहन नियम कायद्यांतर्गत ही कारवाई होणार आहे. खेडकर यांनी वापरलेल्या त्या ऑडी कारवर वाहतूक नियमांचे पालन न केल्याप्रकरणी 21 हजार रुपयांचा दंड सुद्धा आहे. दरम्यान, पुजा खेडकर यांच्यावर कारवाईचे स्वरुप काय असेल, त्यांना आर्थिक दंड होणार की गुन्हा दाखल होणार याबाबतचे चित्र लवकरच पोलिसांकडून स्पष्ट होईल.

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी; चेंबरमध्ये बोलावले अन्…

वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…

कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…

हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!