ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…
पुणे : खासगी गाडीवर लाल-निळा दिवा, VIP नंबरप्लेट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची अखेर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पुजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच IAS असलेल्या डॉ. पुजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकार्यालयात परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
खेडकर यांच्याविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला होता. या अहवालात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले असल्याचा उल्लेख करत खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी, तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचे म्हटले होते. त्यानंतर खेडकर यांची आता बदली करण्यात आली आहे. यानिमित्ताने सरकारी बाबूंच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पूजा खेडकर प्रोबेशन पिरीयडवर असतानाही अधिकारी असल्याच्या थाटात राहायच्या. खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावणे अयोग्य आहे. पण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या 2022 बॅच IAS डॉ. पूजा खेडकर यांनी VIP नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लावून घेतला. शिवाय या खासगी गाडीला लाल आणि निळा दिवा पण लावून घेतला होता. ऑडी कंपनीच्या अलिशान गाडीला लोगो आणि दिवा लावून कार्यालयात येणारे असे हे मोठे अधिकारी कोण याची चर्चा नेहमी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात होत असे. विशेष म्हणजे या अधिकारी मॅडम त्यांच्या या गाडीचे दिवे दिवसासुद्धा चालू ठेवत. वरिष्ठ अधिकारी शासकीय कामासाठी मुंबईला मंत्रालयात गेले असताना त्यांचे अँटी चेंबर बळकावून या अधिकारी मॅडमनी चक्क वरिष्ठांच्या अँटी चेंबरचे साहित्य बाहेर काढून तिथे स्वतःचे कार्यालय थाटले आणि स्वतःच्या नावाचा बोर्डसुद्धा लावला होता, अशी माहिती समोर आली आहे.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
त्यांच्या या वर्तनाबद्दल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिव मंत्रालय यांच्याकडे अहवाल दाखल केला होता. या अहवालात ‘माझे कार्यालय हे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या शेजारीच हवे तसेच मला शिपाई पाहिजे आणि हीच गाडी पाहिजे’ असा अधिकारी हट्ट आहे असा उल्लेख केला होता. जिल्ह्यातील शासकीय कामकाज व्यवस्थित चालण्यासाठी त्यांना प्रशिक्षणासाठी जिल्हा बदलून द्यावा’ असा विस्तृत शेरा जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालात दिला आहे. अधिकारी मॅडमचे वडील दिलीप खेडकर हे जिल्हाधिकारी कार्यालयात येतात आणि तिथल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना दम देतात कि, तुम्ही सगळे माझ्या मुलीला त्रास देत आहात, तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्हाला तिच्याएवढी पोस्ट मिळणार नाही. माझ्या मुलीला त्रास दिला तर तुम्हाला पण भविष्यात या गोष्टीचा त्रास होईल, अशी धमकी सुद्धा देतात, अशी चर्चा सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात होती.’
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पूजा खेडकर यांच्या राहणीमानाची आणि अवास्तव मागण्यांची सरकारी अधिकाऱ्यांच्या वर्तुळात चांगलीच चर्चा रंगत होती.
हाथरस प्रकरण! भोले बाबा फक्त सुंदर महिलांनाच जवळ ठेवायचा अन्…
महाराष्ट्रात डॉक्टरची महिलेला मध्यरात्री विवस्त्र करुन मारहाण…
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…
कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…
हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…