
बिबट्याने केलेल्या हल्ल्यात महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू…
नाशिक: दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी शिवारात घास कापण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन युवतीवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात पायल राजेंद्र चव्हाण (वय २०) हिचा मृत्यू झाला आहे. पायल चव्हाण हिच्या दुर्देवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिकांनी सातत्याने केली आहे.
नाशिक-कळवण रस्त्याजवळ वाघाड कॅनॉललगत असलेल्या राजेंद्र चव्हाण यांच्या वस्तीवर त्यांची मुलगी पायल ही सायंकाळी गुरांना घास कापण्यासाठी गेली होती. यावेळी बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. नातेवाइकांनी तातडीने धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. मात्र बिबट्याच्या हल्ल्यात पायल गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, वनविभागाने पिंजरे लावत बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हृदयद्रावक! बिबट्याच्या हल्ल्यात वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू…
पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…
हृदयद्रावक! बिबट्या दिसल्याने स्नेहल हिने मारली विहिरीत उडी अन् गेला जीव…
Video: बिबट्याने गाठले थेट पोलिस ठाणे अन् पकडली मान…
हृदयद्रावक! विद्यार्थ्याने पेपर लिहिता लिहिताच घेतला जगाचा निरोप…
हृदयद्रावक! लग्नाला काही दिवस बाकी असतानाच मांजाने चिरला युवकाचा गळा…
हृदयद्रावक! ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला पाय अन् दोन बहिणींचा चिरडून मृत्यू…

