
IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…
मुंबई : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील प्रशिक्षण कालावधी संपवण्यात आला असून मसुरीतील प्रशिक्षण संस्थेत परत बोलावण्यात आले आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली.
23 जुलै पूर्वी मसूरी येथील अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरण यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व आणि ओबीसी प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आले. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी येथील लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पूजा खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वापरून परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात येत आहे. शिवाय, त्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती असतानाही त्यांनी ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट काढल्याचे समोर आले आहे. आता या सर्व प्रकरणाची चौकशी केंद्र सरकार करणार आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने पूजा खेडकर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एकसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीने आपला तपास सुरू केला असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल मंत्रालयाला देण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रशिक्षणार्थी असतानाही स्वतःला स्वतंत्र केबिन आणि सरकारी गाडीची मागणी पूजा खेडकरांनी केली होती. त्यानंतर त्यांनी निवासी जिल्हाधिकाऱ्यांची केबिन बळकावून त्या ठिकाणी स्वतःचे फर्निचर ठेवले. तसेच स्वतःच्या खासगी ऑडीवर अंबर दिवा लावला. यामुळे पूजा खेडकर चांगल्याच चर्चेत आल्या. यानंतर त्यांची पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली. पूजा खेडकरांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी बनावट दव्यांग सर्टिफिकेट काढल्याचं समोर आले. तसेच त्यांची आणि त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची संपत्ती असतानाही त्यांनी नॉन क्रिमी लेअरचे सर्टिफिकेट काढल्याचे समोर आले आहे.
IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…
IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…
IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…
IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…
IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…
IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…
IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…
ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी; चेंबरमध्ये बोलावले अन्…
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…
कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…
हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

