IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबांला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यानंतर खेडकर कुटुंबीयांचे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासोबत संबंध असल्याचे समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान या ट्रस्टला मनोरमा खेडकर यांनी 12 लाख रुपयांची देणगी दिल्याचे समोर आले आहे. तीन ऑक्टोबर 2023 ला चेकद्वारे ही देणगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी, यासाठी दिलीप खेडकर यांनी पाथर्डीमधील मोहटा देवीला चांदीचा मुकुट देखील अर्पण केला होता. तसेच, दिलीप खेडकर यांचे भाऊ माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे पाथर्डी तालुका अध्यक्ष राहिलेले आहेत.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

खेडकर कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे. खेडकर कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचे पुणे पोलिसांचे म्हणणं आहे. खेडकर कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केली आहेत. पौड पोलिसांचे एक पथक खेडकर यांच्या घरी येऊन गेल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली आहे.

मनोरमा खेडकर यांच्यावर पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचं एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेले. खेडकर कुटुंबाने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने पोलिस निघून गेले. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांनी पिस्टल ने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल करण्यात आला आहे. तसेच, आठवडाभर वाशिम जिल्ह्यात वनविभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रशिक्षणाचा काळ घालवावा लागणार आहे.

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी; चेंबरमध्ये बोलावले अन्…

वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…

कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…

हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!