IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक

पुणे: राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाड मधील हॉटेलमधून अटक केली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे.

महाड मधून पूजा खेडकरच्या आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे तीन पथक त्या ठिकाणी शोध घेत होते. पूजा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर असल्याची पाहणी केली होती. त्यावेळी तिने पोलिसांना दाद दिली नव्हती. नंतर घराच्या गेटवरती कुलूप लावल्याचे निर्दशनास आले होते. पोलिसांची ३ पथकं मनोरमा खेडकरसह इतरांचा शोध घेत होते. आज अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकरला अटक केली आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकरचा शोध पोलिसांकडून सुरू होता. खेडकरांच्या घराबाहेर नोटिस देखील लावण्यात आली होती. महाडमधील एका हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांचे पथक हॉटेलवरती दाखल झाले. त्यानंतर मनरमा खेडकरला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरवर पौड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मनोरमा खेडकरने बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरसह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलिस ठाण्यात कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल आहे.

मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती ताब्यात घेताना शेजाऱ्यांचीही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेजारच्या जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकर या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या होत्या. त्यांनी हातात पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावले. या शेतकऱ्यांनी पौड पोलिस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता वरून दबाव आल्याने त्यांची तक्रार नोंदवली गेली नव्हती.

IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…

IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…

IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!