पूजा खेडकरच्या बंगल्याच्या गेटवर चढून पोलिस शिरले घरात…

पुणे : बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबावर आता अपहरण, पोलिसांशी अरेरावी आणि आरोपीला पळवून लावल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी पूजा खेडकरच्या घराबाहेर लावलेली नोटीस खेडकर कुटुंबाने फाडल्याचे समोर आले असून, पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर हे अपहरणासाठी वापरलेली गाडी घेऊन सध्या फरार आहेत.

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन!

खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यात दोन जेवणाचे डबे पोहोचल्यामुळे चर्चेला नवे फाटे फुटले आहेत. बंगल्याचा गेट बंद असल्याने हे डबे सुरक्षा भिंतीवर ठेवण्यात आले. काही वेळातच एक कर्मचारी तिथे आला आणि हे डबे उचलून निघून गेला. या पार्श्वभूमीवर, हे जेवण नेमके कोणासाठी मागवले होते? दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर अजूनही बंगल्यात लपून बसले आहेत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

या माहितीची खबर लागताच पुणे पोलिसांची टीम पूजा खेडकर यांच्या बंगल्यावर दाखल झाली. दरवाजा उघडण्यास कोणीही पुढे न आल्यामुळे पोलिसांनी गेटवरून आत प्रवेश केला. पोलिसांनी बंगल्यात उपस्थित असलेल्या व्यक्तींचे जबाब नोंदवले असून, फरार असलेल्या दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचा शोध सुरूच आहे.

दरम्यान, शनिवारी सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमारास, मुलुंड-ऐरोली मार्गावर एक सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH 12 RP 5000 क्रमांकाच्या लँड क्रूझर गाडीचा अपघात झाला. या अपघातानंतर, गाडीतून उतरलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेले. यानंतर ट्रक चालकाने ही माहिती तात्काळ मालक विलास ढेंगरे यांना दिली आणि रबाळे पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी संशयित गाडीचा मागोवा घेतला. तपासादरम्यान MH 12 RP 5000 क्रमांकाची लँड क्रूझर पुण्यातील बाणेर रस्त्यावर एका बंगल्यासमोर उभी असल्याचे आढळले. ही मालमत्ता पूजा खेडकर यांच्या वडील दिलीप खेडकर यांच्या नावे आहे.

पोलिसांनी बंगल्यावर पोहोचून दरवाजा उघडण्याची विनंती केली असता, दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर यांनी दरवाजा उघडण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर त्यांनी पोलिसांवर घरातील कुत्रे सोडल्याचा आरोप आहे. काही वेळाने प्रल्हाद कुमार याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, मात्र याच दरम्यान दिलीप खेडकर दुसऱ्या मार्गाने पळून गेले, अशी माहिती समोर आली आहे.

मनोरमा खेडकरवर चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणे आणि आरोपीला पळवून लावणे अशा गंभीर कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, खेडकर कुटुंबाने मुंबई पोलिसांनी लावलेली नोटीस फाडल्याचेही समोर आले आहे. सध्या दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर हे अपहरणासाठी वापरलेल्या गाडीसह फरार असून, त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या रुग्णालयातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…

मोठी कारवाई! पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ…

बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांचा मोठा दावा…

पूजा खेडकर हिला न्यायालयाकडून मोठा दिलासा…

बडतर्फ IAS पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव…

बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…

UPSC कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर नॉट रिचेबल…

दिल्ली क्राईम ब्रँचने IAS पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा केला दाखल…

मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…

पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक

IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…

IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…

IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!