
मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका; 17 वर्षांनंतर निकाल जाहीर…
मुंबई: मालेगावमध्ये बॉम्बस्फोटाचा निकाल आज (गुरुवार) एनआयए विशेष कोर्टाने सुनावला आहे. मागील 17 वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकरणाचा आज निकाल लागला आहे. विशेष कोर्टाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष सोडले आहे. एनआयएने खटल्याच्या सुनावणी दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात जणांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली होती. मालेगाव बॉम्बस्फोटात सहा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर 100 पेक्षा अधिक जखमी झाले होते.
या प्रकरणात भाजपाच्या माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी अमृतानंद, सुधाकर चुतर्वेदी आणि समीर कुलकर्णी हे आरोपी आहेत.
मालेगाव स्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असे एनआयएच्या विशेष न्यायालयाकडून सांगण्यात आले. 1000 पानांहून अधिक पानांचा निकाल असल्याचे न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने आज (31 जुलै) निकाल सुनावण्यात आला. आरोपींना संशयाचा फायदा बेनिफिट ऑफ डाऊट आहे. केवळ संशयाच्या आधारावर आरोपीना दोषी ठरवू शकत नाही. त्यामुळे सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका करण्यात येत आहे, असं न्यायालयाकडून सांगण्यात आले.
मालेगावच्या भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. तब्बल 17 वर्षानंतर या प्रकरणाचा निकाल मुंबईच्या एनआयए या विशेष न्यायालयात आज निकाल सुनावण्यात आला. निर्दोष सुटका होताच आरोपींनी न्यायालयाचे आभार मानले. आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, असे म्हणत आरोपी भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले.
मला जेव्हा पहिल्यांदा चौकशीला बोलावलं होतं तेव्हा मी माणुसकीच्या नात्याने न्यायचा सन्मान करून मी आले होते. 13 दिवस मला टॉर्चर करण्यात आले. माझं आयुष उध्वस्त केले. मी 17 वर्ष अपमानित झाले. मला स्वतःच्याच देशात आतंकवादी बनवले. ज्यांनी मला हे दिवस आणले त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे. मला ऐकल्याबद्दल मला समजून घेतल्या बद्दल आभार…भगव्याला आंतकवादी म्हटले. भगव्याचा विजय झाला हिंदुत्वाचा विजय झाला. ज्यांनी हिंदुत्वाला आतंकवादाच नाव दिलं त्यांना कधी माफ केलं जाणार नाही, असं निकालानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या.
पोलिस अधिकारी API अश्विनी बिद्रे प्रकरणी न्यायालयाने सुनावली दोषींना शिक्षा…
कृष्णा आंधळे याची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाने दिले आदेश…
मुंबईत न्यायालयीन सुनावणीदरम्यान अचानक स्क्रीनवर सुरू झाला अश्लील Video…
गुजरातमध्ये पाच वर्षे सुरू होते बनावट न्यायालय; वकीलच बनला न्यायाधीश अन्…
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

