टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या पोलिसकाकाचा अखेर मृत्यू…

बारामती: बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलिसकाकाचा आज (सोमवार) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संदीप जगन्नाथ कदम असे निधन झालेल्या हवालदाराचे नाव आहे. त्यांच्या निधनामुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संदीप कदम हे पुणे ग्रामीण पोलिस दलाअंतर्गत पाटस पोलिस चौकीत कार्यरत होते. शुक्रवारी (ता. २२) सायंकाळच्या सुमारास व्यायामासाठी जात असताना पाठीमागून आलेल्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. डोक्याला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. प्रथम त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुन्हा बारामतीत उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली आहे.

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली होती. अनेक गुन्ह्यांच्या उकलीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. अतिशय धाडसी पोलिस कर्मचारी म्हणून त्यांची पोलिस दलात ओळख होती. दरम्यान, संदीप कदम हे रस्त्याच्या कडेने जाताना मागून आलेल्या टेंपोने त्यांना जोरदार धडक दिल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. हा अपघात होता की घातपात आहे, या बाबत पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी केली जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आठ महिन्यांच्या गर्भवती पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू…

पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वत:वरच झाडून घेतली गोळी…

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

पोलिसांच्या गाडीसह चार वाहनांना धडक; पोलिसकाका जखमी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!