
पूजा खेडकरला बनावट प्रमाणपत्र दिलेल्या रुग्णालयातील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…
अहमदनगर : पूजा खेडकर हिला दिव्यंगत्वाची खोटी प्रमाणपत्रे देणाऱ्या अहमदनगर जिल्हा रुग्णालयात खोटी प्रमाणपत्रे देणारे रॅकेट चालत असल्याचे समोर आले आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडून याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोन जण रुग्णालयात काम करणारे कर्मचारी आहेत तर चौघांनी अपंगांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेता यावा यासाठी खोटी प्रमाणपत्रे बनवल्याच समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अज्ञात कर्मचाऱ्यांना हाताशी धरून कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता, रुग्णालयात नोंद न करता ऑनलाईन पोर्टलवार माहिती भरली. त्याद्वारे कर्णबधीर असल्याचे बनावट अपंग प्रमाणपत्र मिळवल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या चौकशीतून समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पाथर्डी तालुक्यातील चौघांवर तर दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी (वर्ग एक) डॉ. साहेबराव डवरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. प्रसाद संजय बडे (पाथर्डी), सुदर्शन शंकर बडे (पाथर्डी), सागर भानुदास केकाण (रा. पागोरी पिंपळगाव, पाथर्डी), गणेश रघुनाथ पाखरे (माणिकदौंडी, पाथर्डी) योगेश बनकर (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी) गणेश गोत्राळ (जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी) या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, शहरातील सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी जिल्हा रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र वितरित केले जात असल्याची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली होती. त्यांनी वरील चौघांची नावेही संशयित म्हणून तसेच त्यांनी कर्णबधिर असल्याचे दिव्यांगत्वाचे बनावट प्रमाणपत्र घेतल्याचेही नमूद केले होते. त्यानुसार जिल्हा रुग्णालयाने अंतर्गत चौकशी केली. त्यामध्ये दिव्यांग प्रमाणपत्र दिलेल्या दिवशी रजिस्टरला कोणतेही संबंधित व्यक्तींना प्रमाणपत्र दिले नसल्याचे तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी अहवाल कागदपत्रेही उपलब्ध नसल्याचे, वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही तपासणी केली नसल्याचे उघड झाले. मात्र पोर्टलवर या चौघांच्याही दिव्यांग प्रमाणपत्राची नोंद आढळली. त्यामुळे राज्य सरकार व जिल्हा रुग्णालय प्रशासनाची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
मोठी कारवाई! पूजा खेडकर IAS सेवेतून बडतर्फ…
बडतर्फ ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांचा मोठा दावा…
पूजा खेडकर हिला न्यायालयाकडून मोठा दिलासा…
बडतर्फ IAS पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव…
बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…
UPSC कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर नॉट रिचेबल…
दिल्ली क्राईम ब्रँचने IAS पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा केला दाखल…
मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…
पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक
IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…
IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…
IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…
IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…
IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…
IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…
IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…
IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…
ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

