बडतर्फ IAS पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली? पोलिसांकडून शोध सुरू…

पुणे : बडतर्फ आयएएस पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्लीतच असलेली पूजा खेडकर आता दुबईला पळाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. पूजा खेडकर अटकेच्या भीतीने दुबईला पळाली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पूजा खेडकर हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर दिल्ली आणि पुणे पोलिस तिच्या मागावर होते. दिल्ली पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे. पूजा खेडकर हिने तब्बल सात वेळा आपल्या नावात फेरफार करून यूपीएससीची परीक्षा दिल्याचे समोर आले आहे. इंग्रजी भाषेमधून नाव देताना पूजा खेडकरने अनेक वेळा स्वतःच्या नावाचे स्पेलिंग बदलून हा सगळा प्रकार केल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासातून आता समोर आले आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पूजा खेडकरने यूपीएससी परीक्षेसाठी नाव लिहिताना सातवेळा फेरफार केल्याच् उघडकीस आले आहे. शिवाय, वडिलांच्या नावांमध्ये सुद्धा फेरफार केल्याचे समोर आले आहे. पूजा खेडकरचा जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळला आहे. पूजा खेडकरचे विविध कारनामे समोर येत असल्याने दिवसेंदिवस अडचणीत आणखी वाढ होताना दिसत आहे.

दरम्यान, पूजा खेडकर यांनी पहिल्यांदा यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा त्यांनी आपले नाव खेडकर पूजा दिलीपराव असे लिहीले होते. दुसऱ्यावेळेला त्यांनी आपल्या नावाचा उल्लेख पूजा दिलीप खेडकर असा केला. तर काही ठिकाणी त्यांच्या नावाचा उल्लेख पूजा मनोरमा दिलीप खेडकर असा देखील आढळून आला आहे.

UPSC कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर नॉट रिचेबल…

दिल्ली क्राईम ब्रँचने IAS पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा केला दाखल…

मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…

पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक

IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…

IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…

IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!