
IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…
पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. पण सर्वात अधिक चर्चा झाली ती पूजा खेडकर यांच्या ऑडी कारची. या कारवर त्यांनी लालदिवा लावला होता. तिथूनच हा वाद सुरू झाला. पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार ही त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या माजी सहकाऱ्याची असून, तिच्यावर २७ हजार रुपयांचा दंड आहे.
पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी थर्मोव्हेरिटा इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे. या कंपनीचा मूळ मालक हे मनोरमा खेडकर यांच्यासोबत एका कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करत होते. मनोरमा खेडकर या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री आहे. डिलिजन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे नाव आहे. ही कंपनी मनोरमा खेडकर यांच्या नावावर आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पुण्यात नियुक्तीवर असताना पूजा खेडकर या लालदिवा लावलेल्या ऑडीने येत होत्या. पूजा खेडकर ज्या ऑडी कारचा वापर करत होत्या. त्या कारवर अनेक दंड (चलान) ठोठावण्यात आले आहेत. पूजा खेडकर वापरत असलेली कार त्यांच्या खासगी अभियांत्रिकी कंपनीच्या नावाने नोंदणीकृत असल्याचं पोलिस तपासांत निष्पन्न झाले आहे. या कारवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 21 तक्रारींची नोंद आहे. तसेच या कारवर 27 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, जो अद्याप वसूल केलेला नाही.
पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावल्या बद्दल पुणे पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी गाडीवर “महाराष्ट्र शासन” अशी पाटी देखील लावली होती. याप्रकरणी देखील पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे समजते. मोटर वाहन नियम कायद्यांतर्गत ही कारवाई होणार आहे.
IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…
IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…
IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…
ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
अधिकाऱ्यांनी युवतीकडे केली शरीरसुखाची मागणी; चेंबरमध्ये बोलावले अन्…
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…
कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…
हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

