दिल्ली क्राईम ब्रँचने IAS पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा केला दाखल…

नवी दिल्ली: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यूपीएससीने केलेल्या तक्रारीनंतर दिल्ली क्राईम ब्रँचने पूजा खेडकर यांच्यावर बनावटगिरी, फसवणूक आणि दिव्यांगत्वाच्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पूजा खेडकरांच्या प्रकरणात आता दिल्ली क्राईम ब्रँचही तपास करणार आहे.

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर खोटे दिव्यांग प्रमाणपत्र बनवून परीक्षा दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवाय, कोट्यवधींची संपत्ती नावावर असताना ओबीसी नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेटही त्यांनी काढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कार्मिक मंत्रालयाने एक समिती नेमली असून दोन आठवड्यात त्याचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

दरम्यान, पूजा खेडकरांचा राज्यातील प्रशिक्षणाचा कालावधी संपवण्यात आला असून 23 जुलै पर्यंत त्यांना मसुरीतील प्रशिक्षण केंद्रात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यूपीएससीने त्यांना एक कारणे दाखवा नोटिसही बजावली असून त्यामध्ये खोटे प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी कारवाई का करू नये? असा सवाल विचारला आहे.

पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांना दुसरी नोटीस दिली आहे. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात छळवणुकीचा आरोप पूजा खेडकरांनी केला आहे. या आरोपांसदर्भात ही नोटीस देण्यात आली आहे. वाशिम पोलिसांच्या एपीआय श्रीदेवी पाटील यांनी वाशिम विश्रामगृहावर जाऊन खेडकरांना नोटीस दिली. पूजा खेडकर यांना याआधी नोटीस देऊनही त्या चौकशीसाठी गैरहजर राहिल्या होत्या. त्यामुळे दुसरी नोटीस देण्यात आली आहे.

मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…

पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक

IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…

IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…

IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…

IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!