पुणे जिल्ह्यातील कॉलेजमधील पाच विद्यार्थ्यांनी मारली दांडी अन् बेतले जीवावर…

पुणे : पुणे जिल्ह्यातील एम.एस कॉलेजमधील 5 विद्यार्थ्यांनी कॉलेजला सुट्टी दांडी मारून मावळातील कासारसाई धरणावर जाण्याचा बेत आखला. एकाचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सारंग रामचंद्र डोळसे (वय १७, रा. थेरगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

थेरगाव येथील एम एस ज्युनियर कॉलेजचे पाच विद्यार्थी घरातील पालक आणि शिक्षकांना न सांगता कासारसाई धरणावर पर्यटनासाठी आले होते. धरण परिसराचा आनंद घेत होते. पाण्यात खेळत असताना पाण्याच्या खोलीचा सारंग याला अंदाज आला नाही आणि क्षणार्धात तो खोल पाण्यात वाहून गेला.

सारंग बुडाल्याची घटना लक्षात येताच त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली, त्यांचा आवाज ऐकूण स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी या घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच परंदवाडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ, तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमला पाचारण केले. रेस्कु टीमने काही वेळातच या विद्यार्थ्यांचा मृतदेह बाहेर काढला. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती शिरगावं-परंदवाडी पोलिसांकडून देण्यात आली आहे.

हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात चार मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू…

हृदयद्रावक! एकमेकांना मिठी मारल्याने चौघांचा बुडून मृत्यू…

धक्कादायक Video: लोणावळा येथील भुशी डॅमवर कुटुंब गेलं वाहून…

हृदयद्रावक! एक चिमुकली पाण्यात पडली अन् पुढे तिघींचा मृत्यू…

मुंबईतील रिलस्टार युवतीचा धबधब्याजवळ तोल जाऊन मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!