इंटरशिप करत असलेल्या डॉक्टरने घेतला जगाचा निरोप…
गोंदिया : शासकीय महाविद्यालयातील शिकावू डॉक्टर भूषण विशाल वाढोणकर (वय २४) याने वस्तीगृहातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
गोंदिया जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये इंटरशिप करत असलेला भूषण विशाल वाढोणकर (वय 24 वर्ष, रेल्वे चांदूर अमरावती जिल्हा येथे राहणारा) हा विद्यार्थी गोंदिया येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वस्तीगृहात वास्तव्याला होता. इमारत क्रमांक 7 मध्ये तिसऱ्या माळ्यावर डी 31 क्रमांकाच्या रूममध्ये राहत होता. सकाळी आपली ड्युटी करून सायंकाळी रूम वर आला. रूममध्ये रहाणारा सहकारी हा रात्रीची ड्युटी असल्याने आपल्या ड्युटीवर गेला. सकाळी 8 वाजेपर्यंत रुम सहकाऱ्याने त्याला कॉल केला. मात्र, कॉलचा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी रूमच्या बाजूला असलेल्या रूममध्ये राहणाऱ्यांना कॉल केले. त्यांनी रूम मध्ये जाऊन बघितले असता. भूषण याने सीलिंग पंख्याला दोराने गळफास घेतला असल्याचे आढळून आले. ही घटना सकाळी 8.30 ला उघडकीस आली. याची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली आहे.
पोलिसांनी घटनस्थळी जाऊन मृतदेह काढून शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…
हृदयद्रावक! आईने नऊ महिन्यांच्या चिमुकलीला दिला गळफास अन्…
हृदयद्रावक! चूक कोणाची? आई मला जगायचं गं…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…