आयटी मधील युवक बुरखा घालून महिलांच्या वॉशरुममध्ये घुसला अन् पुढे…
कोची (केरळ): एका मॉलमधील महिलांच्या वॉशरूममध्ये बुरखा घालून युवकाने प्रवेश केल्यानंतर चित्रिकरणाच्या उद्देशाने मोबाईल लपून ठेवला होता. संबंधित घटना उघड झाल्यानंतर युवकाला (वय २३) अटक करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
लुलू मॉलमध्ये बुधवारी (ता. १६) ही घटना घडली. आरोपी हा बी.टेक-ग्रॅज्युएट आहे. या कृत्यामुळे त्याच्यावर कलम 354C, 419 आणि कलम 66E अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आरोपी एका आयटी कंपनीत काम करत असून बुधवारी तो बुरखा घालून लुलू मॉलमधील महिलांच्या वॉशरूममध्ये शिरला होता. त्यानंतर त्याने आपला फोन एका छोट्या ‘कार्डबोर्ड बॉक्स’मध्ये ठेवला होतो. त्याला एक छिद्र केले होते. ज्यामुळे तो रेकॉर्डिंग करण्याच्या उद्देशाने ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. युवकाला ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास करत आहोत.’
दरम्यान, महिलांनी सार्वजनिक ठिकाणी अधिक सावध राहिले पाहिजे. कारण असे समाजकंठक कुठे ही असू शकतात. आपल्या या वाईट कृत्यांमुळे ते माणुसकीला काळीमा फासतात. संबंधित युवकाने यापूर् अशी कृत्ये केली आहेत का? याची चौकशी पोलिस करत आहेत.
पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…
पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?