आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई…

पुणे (संदिप कद्रे): नियमांचे पालन न करणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर आयपीएस सत्यसाई कार्तिक यांनी धडक कारवाई केली आहे. दोन्ही बार रेस्टॉरंट मालकांवर गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास करत आहेत.

लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट ई.यांचेकरीता अपर जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांनी ०६/०३/२४ रोजी सीआरपीसी कलम १४४ अन्वये प्रतिबंध आदेश जारी केले होते. तसेच सत्यासाई कार्तिक यांनी सर्व आस्थापना चालकांना सदर आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबतचे स्पष्ट निर्देश दिले होते. तरीही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती श्री. कार्तिक यांना प्राप्त झाली होती.

सत्यसाई कार्तिक यांनी आज (शुक्रवार) त्यांचे पथकाला नमूद माहिती मिळालेल्या ठिकाणी पाठवले असता १) दीपा बार अँड रेस्टॉरंट, कामशेत, तालुका मावळ जिल्हा पुणे, व २) फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट, वडगाव, तालुका मावळ जिल्हा पुणे अशा दोन्ही ठिकाणी पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील दोन्ही ठिकाणी बार रेस्टॉरंट त्यांचे ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई. विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी विक्री करताना दिसून आले. सदर बारमध्ये ऑर्केस्ट्रा- संगीत विहित कालमर्यादेपेक्षा पेक्षा अधिक वेळेसाठी सुरू असल्याचे मिळून आल्याने नमूद दोन्ही बारमालकांवर भा.द.वि. कलम १८८ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३३ (डब्ल्यू) अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे अनुक्रमे कामशेत पोलिस स्टेशन व वडगाव मावळ पोलिस स्टेशन येथे नोंद करण्यात आले असून, पुढील तपास कामशेत व वडगाव मावळ पोलिस करत आहेत.

दरम्यान, अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना चालकांवर कठोर कायदेशीर कारवाईची मालिका यापुढेदेखील सुरच राहणार असून आस्थापना चालकांनी त्यांना घालून दिलेल्या नियमांचे व वेळेच्या बंधनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन सत्यसाई कार्तिक यांनी केले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पो.हवा नितेश (बंटी) कवडे, पो.ना दत्ता शिंदे, पो.कॉ सुभाष शिंदे, पो.कॉ राहीस मुलानी यांचे पथकाने केली आहे.

सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची गुटख्या विरोधात धडक कारवाई…

सत्यसाई कार्तीक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत धडाकेबाज कारवाई…

सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची धडक कारवाई…

पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची दारु वाहतूकीवर मोठी कारवाई…

लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…

सत्यसाई कार्तिक: क्रिकेट प्लेयर ते आयपीएस अधिकारी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!